कोकण

खचलेल्या एन्रॉन पुलाचे काम अंतिम टप्प्यात

CD

ratchl२४६.jpg-
०४७३२
चिपळूण ः वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पूल.
-------------
एन्रॉन पुलाचे काम अंतिम टप्प्यात
चिपळूण, ता. २५ः महापुरात खचलेल्या एन्रॉन पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून खचलेल्या भागाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलावरून लाईटवेट वाहनांची वाहतूक सुरू केली जाणार आहे. त्याप्रमाणे पुलाचा खचलेला भाग वर उचलण्यात यश आले असून लवकरच उर्वरित काम मार्गी लावण्यात येणार आहे.
एन्रॉन पुलाचा एक पिलर २०२१ च्या महापुरात खचला. यामुळे दोन्ही बाजूने पूल खालच्या दिशेने खचला. परिणामी या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. तरीही काही मोटारसायकलस्वार या धोकादायक पुलावरून दुचाकी नेत होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे खणून पूल वाहतुकीसाठी बंद केला. यानंतर या पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी स्थानिक नागरिक व आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनवेळा या पुलाच्या दुरुस्तीची निविदा काढली. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिसऱ्यावेळी देवरे अँड सन्स या कंपनीला पुलाच्या दुरुस्तीचा ठेका देण्यात आला. त्याप्रमाणे कंपनीने २० दिवसांपुर्वी या कामाला सुरवात केली.
पहिल्या टप्प्यात खचलेल्या ठिकाणचा स्लॅब उखडून आतील स्टील मोकळे केले. जो पिलर खचला होता त्या पिलरच्या बाजूने हायड्रोलिक जॅक लावून खचलेला स्लॅब दोन्ही बाजूने वर उचलण्यात आला. त्यामुळे आता खचेलला एन्रॉन पूल समपातळीत आला आहे. पुढच्या टप्प्यात पुलावर डांबरीकरणाचे काम करून हलकी वाहने सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे. मात्र अवजड वाहनांना या पुलावरून बंदी राहणार असून त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी खांबाच्या साह्याने अटकाव केला जाणार आहे. मात्र पावसाळ्यानंतर पुन्हा हे काम हाती घेण्यात येणार असून त्याच्या मजबुतीकरणावर भर दिला जाणार आहे. त्या कामानंतरच या पुलावरून अवजड वाहतूक सुरू करण्याचे नियोजन केले जाणार आहे.

चौकट
प्रवाशांमधून समाधान
गेली दोन वर्षे एन्रॉन पूल वाहतुकीस बंद असल्याने अनेक प्रवाशांची व वाहतूकदारांची गैरसोय होत होती. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना अडचणी येत होत्या. तसेच नजीकचा फरशीपूल अरूंद असल्याने त्यावरून जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशावेळी एन्रॉन पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने मार्गी लागत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT