कोकण

संक्षिप्त-व्यापारी बांधवांना ''राज्यकर''चे आवाहन

CD

संक्षिप्त

व्यापारी बांधवांना
''राज्यकर''चे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : व्हॅट, बीएसटी, सीएसटी कायद्यांतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी ३० जून २०१७ पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकीकरिता १ मे ते ३१ ऑक्टोबरपर्यंत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सर्व व्यापारी बांधवांनी घेऊन ''एक पाऊल थकबाकी मुक्तीकडे'' टाकावे, असे आवाहन राज्यकर उपआयुक्त एस. आर. मोटकर यांनी केले आहे. वैधानिक आदेशानुसार २ लाख रुपये किंवा कमी असलेल्या थकबाकीसाठी निर्लेखित करण्यात येईल. दोन लाखपेक्षा जास्त थकबाकीसाठी विवादित करात ५० ते ७० टक्के तसेच व्याजात ८५ ते ९० टक्के व शास्तीचा ९५ टक्के सवलत देण्यात येईल. ५० लाखांपर्यंत थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना एकत्रित २० टक्के रक्कम भरून थकबाकीतून मुक्त होता येईल. ५० लाखांपेक्षा जास्त थकबाकीदारांसाठी हप्ते सवलतीचा पर्याय उपलब्ध आहे. आवश्यक रक्कम व अर्ज विहित मुदतीच्या आत सादर करावेत, असे आवाहन केले आहे.

वैभववाडीत सापडलेली ''ती'' चेन
वाडा येथील प्रतीक्षा काळेंची
वैभववाडी, ता. २४ ः शहरात काल (ता. २३) सापडलेली सोन्याची चेन वाडा (ता. देवगड) येथील प्रतीक्षा काळे यांची असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी ती काळे यांच्याकडे सुपूर्द केली. काळे यांनी ती चेन पोलिसांकडे आणून देणाऱ्या करुळ येथील अनंत पाटील आणि सुनील कुंभार या दोघांचे आभार व्यक्त केले.
पाटील व कुंभार यांना शहरातील दत्तमंदिर नजीक सोन्याची चेन ती चेन सापडली होती. त्यांनी ती पोलिसांकडे सुपूर्द केली. सांगुळवाडी कृषी महाविद्यालयातून वाडा येथे घरी गेल्यानंतर आपली चेन गहाळ झाल्याचे प्रतीक्षा यांच्या लक्षात आले. याबाबत आज त्या येथील पोलिसांत तक्रार देण्यासाठी आल्या असता पोलिसांनी हरवलेल्या चेनचे वर्णन विचारले. त्यावेळी तिने आपल्याकडील चेनचे छायाचित्र, खरेदी पावती आणि वर्णन तंतोतंत सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ती चेन प्रतीक्षा यांच्या ताब्यात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT