कोकण

मळेवाड-गोवा विनापरवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करा

CD

टीपः swt२५२०.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - राजन मुळीक

मळेवाड-गोवा विनापरवाना
वाळू वाहतुकीवर कारवाई करा
राजू मुळीक ः आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः मळेवाड कोंडुरा सातार्डा मार्गे गोव्यात रात्रीच्यावेळी आठ ते दहा डंपरमधून विनापरवाना वाळू वाहतूक केली जाते. याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल एका रात्रीत बुडतो. ज्याप्रमाणे इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली, त्याच पद्धतीने या वाळू वाहतुकीवर कारवाई करून शासनाचा बुडणारा महसूल वाचवावा; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्गातून गोव्यात अनधिकृतरित्या वाहतूक केल्या जाणाऱ्या वाळूचे प्रमाण वाढले आहे. याला दरही मोठ्या प्रमाणात मिळत आहे. वाळू जितकी लांबपर्यंत न्यायची, तेवढी त्याची किंमत वाढत आहे. सद्यस्थितीत वाळूच उपलब्ध नसल्याने गोव्यातून मोठी मागणी आहे. मळेवाड कोंडुरा सातार्डा मार्गे रोज आठ ते दहा वाळूने भरलेले डंपर गोव्यात जातात. अशा विनापरवाना वाळू वाहतुकीवर पोलिस किंवा महसूल विभाग कारवाई का करत नाही, असा सवाल मुळीक यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे अशा विनापरवाना वाहतुकीवर कारवाई न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुळीक यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT