कोकण

हॉटेल ‘यशधरा’चे मालक यशवंत राऊळ यांचे निधन

CD

swt2539.jpg
05027
यशवंत राऊळ

हॉटेल ‘यशधरा’चे मालक
यशवंत राऊळ यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः येथील हॉटेल व्यवसायिक ‘हॉटेल यशधरा’चे मालक व तेंडोली गावचे रहिवासी यशवंत राऊळ यांचे (वय ८४) आज सकाळी गोवा-बांबोळी येथे निधन झाले. खडतर कष्ट करून त्यांनी हॉटेल व्यवसाय उभारला. जिल्ह्यातील पहिले सुसज्ज हॉटेल अशी त्यांनी ''यशधरा''ची ओळख निर्माण केली. मुंबईत येथे इंटरियर डिझाईनचा व्यवसाय करीत होते. मुंबईत मन रमत नसल्याने गावी जाऊन व्यवसाय करावा, या इच्छेने त्यांनी हॉटेल ''यशधरा''ची उभारणी केली. गावात व्यवसाय सुरू करण्याच्या विचाराने ते मुंबई सोडून गावी दाखल झाले आणि कष्टाने हॉटेल व्यवसाय सुरू केला. मुंबई-गोवा मार्गावर ''यशधरा'' हे कुडाळमधील सुसज्ज असे पहिले हॉटेल सुरू केले. हॉटेल व्यवसायात असताना अनेक सामाजिक, धार्मिक कार्यातही त्यांनी हिरहिरीने सहभागी घेतला. भाजपचे नेते, माजी उपसभापती राजू राऊळ व हॉटेल व्यावसायिक बाळा राऊळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.
शशिकांत सावंत
यांचे निधन
नांदगाव, ता. 25 ः कोळोशी वरचीवाडी येथील शशिकांत रामचंद्र सावंत यांचे नुकतेच राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. आपल्या सुस्वभावाने ते परिसरात परिचित होते.
...............
टीपः swt2540.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - तुकाराम गावडे

तुकाराम गावडे
यांचे निधन
बांदा, ता. 25 ः पाडलोस-देऊळवाडी येथील तुकाराम धोंडू गावडे (वय 76) यांचे राहत्या घरी निधन झाले. गावडे यांनी उतार वयातसुद्धा भातशेतीसह आंबा, काजू, नारळ, सुपारीची बागायत करून एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. माजी सैनिक नीलेश गावडे यांचे ते वडील होत.
.............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT