कोकण

शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर

CD

swt२६६.jpg
०५०९६
हर्ष नकाशे

शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर
वालावलमध्ये आयोजनः श्रुती सावंत, हर्ष नकाशे, सौ. ईश्वरी तेजम यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ः वालावल येथे होमिओपॅथी अशोक वासुदेव प्रभू यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. विविध तीन गटांमध्ये श्रुती सावंत, हर्ष नकाशे आणि ईश्वरी तेजम यांची स्वरसिंधुरत्न पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने (कै.) प्रभू स्वरसिंधुरत्न स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेची आणि त्यांची आठवण म्हणून त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा आयोजित केली होती. वालावल (ता. कुडाळ) येथील लक्ष्मीनारायण मंदिरात स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेतील गटनिहाय विजेते असेः पहिला गट (११ ते १६ वर्षे शालेय) - श्रुती सावंत, स्वरांगी गोगटे, तेजल गावडे. दुसरा गट (१७ ते ३५ वर्षे - युवा गट) - हर्ष नकाशे, पल्लवी पिळणकर, हर्षल मेस्त्री. तिसरा गट (३५ वर्षांवरील सर्वांसाठी खुला) - ईश्वरी तेजम. पहिल्या गटात श्रुती सावंत, ओजस्वी पिळणकर, अनुष्का आपटे, सोहम साळसकर, गीता गवंडे, स्वरांगी गोगटे, भाविक मेस्त्री, तेजल गावडे आणि सारा मणेरीकर, दुसऱ्या गटात गौरी पारकर, सानिका गावडे, संपदा दुखंडे, हर्ष नकाशे, शुभम राणे, वैष्णवी प्रभू, पल्लवी पिळणकर आणि हर्षल मेस्त्री तर तिसऱ्या गटात ईश्वरी तेजम आणि निखिल प्रभू या दोघा स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रदीप धोंड आणि मुग्धा भट-सामंत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
तिन्ही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्वरसिंधुरत्न पुरस्कार रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र या स्वरूपात असेल. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सौ. भट-सामंत यांच्या मैफलीत श्रोते रंगून गेले. शास्त्रीय संगीताने प्रारंभ करून त्यांनी निवडक भक्तिगीते सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीत किशोर सावंत (तबला), प्रणव मेस्त्री (पखवाज) आणि नीलेश मेस्त्री (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली. मैफलीदरम्यान दिलीप गेलेल्या या मैफलीत किशोर सावंत (तबला), प्रणव मेस्त्री (पखवाज) आणि नीलेश मेस्त्री (हार्मोनियम) यांनी संगीतसाथ केली.
मैफलीदरम्यान दिलीप ठाकूर, लक्ष्मीनारायण मंदिर संस्थेचे गुरू देसाई, अर्चना परब आणि प्रकाश चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संयोजक प्राचार्य प्रशांत धोंड, डॉ. प्रणव प्रभू, ध्वनिव्यवस्था सांभाळणारे किरण नाईक आणि गायिका मुग्धा भट-सामंत यांनाही गौरविण्यात आले. स्वरसिंधुरत्न पुरस्कारांचे वितरण २९ जूनला श्री क्षेत्र वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. स्वरसिंधुरत्न पुरस्कार मिळालेल्या तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्वांच्या गायनाचा विशेष कार्यक्रम त्यादिवशीच सायंकाळी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT