कोकण

श्री गणेशमूर्तिकार संघटनेचा रविवारी स्नेहमेळावा

CD

श्री गणेश मूर्तिकार संघटनेचा आज स्नेहमेळावा
मूर्तिकारांसाठी मार्गदर्शन; शासकीय योजनांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ः रत्नागिरी तालुका श्री गणेश मूर्तिकार संघातर्फे रविवारी (ता. २८) सकाळी साडेनऊ ते ५ या वेळेत पानवल-होरंबेवाडीतील सांब जुगाई सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अनंत होरंबे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांर्गत तालुक्यातील गणेश मूर्तिकारांसाठी कार्यशाळा होणार आहे.
या वेळी वेस्ट रिजन कॅमलिनचे झोनल मॅनजर नंदकुमार गायकवाड, सेल्स मॅनेजर संतोष काळे, देवरूख डी-कॅड कॉलेजचे रणजित मराठे, ट्रेनिंग ऑफिसर हॅण्डिक्राफ्ट सर्व्हिस सेंटर (केंद्र सरकार) कोल्हापूर विभागाचे रितेशकुमार, श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर बोरसुतकर, राजेंद्र जाधव, मूर्तिकार ज्ञानेश कोटकर, प्रसाद ट्रेडर्स भायखळा-मुंबईचे अजय सायगावकर, मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी आणि प्रसिद्ध मूर्तिकार आशिष बेलवलकर उपस्थित राहणार आहेत.
स्नेहमेळाव्यात सकाळी ९.३० वा. दीपप्रज्वलन व श्री गणेशपूजन, सकाळी १० वा. स्वागत, प्रास्ताविक १०.३० वा. कॅमल कंपनीचे रंगकाम कार्यशाळा व मार्गदर्शन, सकाळी ११.३० वा. कागदी लगदा, शाडूमाती प्रात्यक्षिक, दुपारी १२ वा. केंद्र सरकारच्या हॅण्डिक्रॉफ्ट विभागातर्फे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन, दुपारी १ वा. स्नेहभोजन, दुपारी ३ वा. प्रसाद ट्रेडर्स यांचे रंगकाम प्रात्यक्षिक व मार्गदर्शन, सायं. ४ वा. कॅमल कंपनीतर्फे आकर्षक भेटवस्तू वितरण, ५ वा. आभार प्रदर्शन होईल. तालुक्यातील श्री गणेश मूर्तिकारांनी या स्नेहमेळावा व कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका श्री गणेश मूर्तिकार संघटनेतर्फे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT