कोकण

दोन महिलांना देणार अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

CD

दोन महिलांना देणार होळकर पुरस्कार
प्रत्येक ग्रामपंचायतीमधून निवड; ३१ मे रोजी सन्मान
रत्नागिरी, ता. २६ः महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महिला व बालविकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधून दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीदिनी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांनी स्वतःची वैयक्तिक व केलेल्या कार्याच्या माहितीसह ग्रामपंचायतीकडे २७ मे पर्यंत अर्ज करावा असे जिल्हा प्रशासनाचे वतीने अहवान करण्यात येत आहे.
प्रत्येक गावात पुण्यश्लोक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्काराने प्रत्येक ग्रामपंचायतीतून दोन कर्तबगार महिलांचा गौरब करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीचे हददीतील राहिवासी असावे. ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्रात महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य असावे. सदर कामाचा कालावधी किमान तीन वर्ष असावा. तसेच महिलांच्या समस्या व प्रश्नाबाबत जाणीव व संवेदना असावी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री सन्मान पुरस्कारासाठी निवड झालेल्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ, तसेच रोख ५०० रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी ग्रामपंचायत स्तरावर संरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, व आशा सेविका यांची निवड समिती असणार आहे. महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिलांनी २७ मे पर्यंत संबधित ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर २८ मे रोजी निवड करुन ३१ मे रोजी ग्रामपंचायती कार्यालयामध्ये निवड झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कर्तबगार महिलांचा गौरव होणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून याचे माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याची शासनाने विशेष दखल घेतली आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांच्या महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या महिलांच्या उल्लेखनीय कार्याची शासनाचे दखल घेऊन त्यांचा गौरव करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यामुळे उत्कृष्ठ कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान होऊन त्या सामाजिक उपक्रमात अजून सहभागी होतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT