कोकण

वेंगुर्ले पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल

CD

05337
वेंगुर्ले ः नाट्यमहोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी.


वेंगुर्ले पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल

मंत्री दीपक केसरकर; मधुसुदन कालेलकर स्मृती नाट्यमहोत्सवाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः वेंगुर्ले नगरपरिषद दिवसेंदिवस प्रगतीची शिखरे गाठत असताना या नगरपरिषदेचा १५० वा वर्धापन दिन सोहळा कसा, असेल याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. वेंगुर्ले हे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र व वेंगुर्ले नगरपरिषद हा त्याचा केंद्रबिंदू ठरेल, असा विकास साधण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी (ता. २५) येथे केले.
येथील नगरपरिषदेच्या १४७ व्या वर्धापन दिनाचे व नाटककार मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित नाट्य महोत्सवाच्या उद्‍घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना केसरकर बोलत होते. या महोत्सवाच्या उद्‍घाटनाचा मान मंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिला आणि त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार ओंकार ओतारी, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, सुनील डुबळे, नम्रता कुबल, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, आर्किटेक्ट अमित कामत आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘वेंगुर्ले तालुका हा नाटककार, कवी, लेखक आदी कलाकारांची भूमी आहे. या भागांत मोठ्या प्रमाणांत साहित्यिक आहेत. उभादांडा येथे कविववर्य मंगेश पाडगांवकर यांचे कविता स्मारकासंदर्भात शालेय शिक्षण संचालकांना जागेची पाहणी करण्यासाठी पाठविले होते. त्यांनी उभादांडा हा गाव व स्मारकाची जागा पाचगणी पर्यटन क्षेत्रापेक्षाही सुंदर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘कवितांच्या गावा’साठी लागेल तेवढा निवढा दिला जाईल. आपल्या भागात पर्यटन विकासास भरपूर वाव आहे. मुंबई येथे मराठी भवन बांधकाम होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी ही गोष्ट अभिमानस्पद आहे. शहरात लवकरच समुद्र किनारी सायकल ट्रकही पर्यटन दृष्ट्या साकारणार असून त्यासाठी निधीची उपलब्धता केली जाणार आहे.’’
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेसह विविध क्षेत्रांत केलेली प्रगती पाहून अभिमान वाटतो. १४७ वर्षे झालेली ही भारतातील एक जुनी नगरपरिषद असून चांगल्या कामातून मिळविलेल्या पुरस्कारांची जत्रा येथे आहे. सुंदर असा हा नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह, म्युझियम आदींच्या माध्यमातून प्रगती होण्यासाठी शिक्षणमंत्री केसरकर वेंगुर्लेला झुकते माप देतात. प्रशासन म्हणून आम्ही ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत.’’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी कंकाळ यांनी यांनी केले. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नाट्यरसिक उपस्थित होते.
--
चौकट
..तर वेंगुर्लेत पहिली पाणबुडी
‘‘मी विकासाचे व्हीजन ठेवूनच विकासकामे करत आहे. देशातील पहिली पर्यटन पाणबुडी वेंगुर्लेत सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच हा प्रकल्प जर सरकारमार्फत करणे शक्य झाले नाही, तर उद्योजकांमार्फत विकासासाठी खासगी गुंतवणूक करून हा प्रकल्प करणार आहे. त्यामुळे देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीचे वेंगुर्लेतील स्वप्न सत्यात नक्कीच उतरेल, असे मंत्री केसरकर म्हणाले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT