कोकण

चिपळुणातील नालेसफाई अंतिम टप्प्यात

CD

ratchl274.jpg
05353
चिपळूणः शहरात सुरू असलेली नालेसफाईची कामे.

चिपळुणातील नालेसफाई अंतिम टप्प्यात
चिपळूण, ता. २८ः पावसाळा तोंडावर असल्याने चिपळूण पालिका प्रशासनाने शहरातील नाले व गटारे सफाईकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. मनुष्यबळासह जेसीबीच्या साहाय्याने तुंबलेली गटारे व नाले यांची स्वच्छता केली जात आहे. आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत सर्व ठिकाणची साफसफाई मार्गी लागेल, अशी माहिती आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते यांनी दिली.
पावसाळ्यात नाले व गटारे तुंबण्याचे प्रकार सर्रास घडतात. सांडपाणी रस्त्यावर, घरांमध्ये तसेच दुकानांत शिरून नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय साथीचे आजारही पसरतात. शहरातील बहुतांशी मोठे नाले हे शिव व वाशिष्ठी नदीला जोडलेले आहेत. अतिवृष्टीच्या काळात नद्यांना पूर येऊन ते पाणी नाल्यांद्वारे पुढे सरकते. या पाण्यासोबत दगडगोटे व माती ही सुद्धा नाल्यात वाहून येते. साचलेला गाळ, कचरा व झाडीझुडपे यांची स्वच्छता न झाल्यास नाले व गटारे तुंबतात. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नगर पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व नाले व गटारांच्या साफसफाईचे काम हाती घेतले जाते.
यावर्षी दीड ते दोन महिने अगोदरच या कामाला सुरवात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक महेश जाधव यांनी विविध भागात सफाई कामागारांच्या टीम केल्या आहेत. मोठे नाले जेसीबीच्या साहाय्याने साफ केले जात आहेत तर जेथे जेसीबी जात नाही तेथील नाले व गटारे सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहर व परिसरात आजतागायत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. या सफाईदरम्यान शेकडो टन प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक आढळून आल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT