कोकण

रत्नागिरी ः किनारपट्टीवरील साहसी क्रीडाप्रकारांना ब्रेक

CD

किनारपट्टीवरील साहसी
क्रीडाप्रकारांना ब्रेक
पर्यटन विभागाच्या सूचना; पर्यटकांचा हिरमोड
रत्नागिरी, ता. २७ः पावसाळा जवळ येऊ लागल्याने वातावरणात बदल होत आहे. खराब हवामानामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जल व साहसी क्रीडा पर्यटन २६ मे पासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. पर्यटन हंगाम संपता संपता हे आदेश आल्यामुळे अखेरच्या टप्प्यात जलपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. कोकण किनारपट्टीवरील साहसी क्रीडाप्रकारांना त्यामुळे ब्रेक लागला.
मागील काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील अनेक किनारपट्ट्यांवर साहसी क्रीडाप्रकार, नौकानयन सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे-काजीरभाटी, आरेवारे या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यावर्षी उशिराने सुरू झालेल्या पर्यटन हंगामात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली होती. विशेषत: जलपर्यटनाला वाढता प्रतिसाद मिळत होता. सध्या वॉटरस्पोर्टस् चालवणार्‍या संस्थांना ३१ मे पर्यंत परवानगी देण्यात आली होती. मान्सून जूनमध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच हवामानात बदल होऊ लागला आहे. यामुळे उत्साही पर्यटकांना दुर्घटनेला सामोरे जावे लागू नये या दृष्टीने पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवींद्र पवार यांनी सर्व वॉटरस्पोर्टस् संस्था चालकांना २६ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलपर्यंटन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आदेश मिळाल्याने शनिवार (ता. २७) मेपासून जलपर्यटन बंद ठेवले आहे. चौथा शनिवार व रविवार असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आले होते. ऐन हंगामात हा आदेश आल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT