कोकण

यिन समीटचा शानदार समारोप

CD

लोगो-
आजच्या अंकातून

‘यिन समर यूथ समीट’ची
सळसळत्या उत्साहात सांगता
---
दोन दिवस विविध तज्ज्ञांनी दिल्या मौलिक टिप्स
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आयोजित ‘चला, घडू देशासाठी’ या ‘समर यूथ समीट २०२३’ची आज तरुणाईच्या सळसळत्या उत्साहातच सांगता झाली. महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, धाराशिव आदी जिल्ह्यांतून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिबिरात सहभागी झाले. विवेकानंद महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात सलग दोन दिवस शिबिरांतर्गत विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
शिबिराचे मुख्य प्रायोजक पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, सहप्रायोजक विद्या प्रबोधिनी, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, रिलायन्स ॲनिमेशन ॲकॅडमी, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशन तसेच डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, फोर्ट इंटरनॅशनल स्कूल, विवेकानंद महाविद्यालय, वेल्टा तसेच संजीवन इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पन्हाळा यांचे सहकार्य मिळाले.
‘यिन’ प्रमुख श्‍यामसुंदर माडेवार, ‘यिन’ संपादक संदीप काळे, ‘यिन’ सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, ‘यिन’ अधिकारी अभिजित शिंदे, राजलक्ष्मी कदम, दुर्वा सावंत, चेतना रांगी, शिवानी नागराळे, काजल चव्हाण, संकेत पवार, पृथ्वीराज चव्हाण, ऋषीकेश कांबळे, ओंकार रसाळ, प्रसाद गायकवाड, विश्‍वजित पाटील, साईनाथ मोहिते, प्रतीक पाटील, तानीया मुरसल, स्नेहल परिट, पार्थ सावंत, श्रीशैल पाटील, शिवानंद पोळ, पूजा निखाडे, मोहन मोरे, अजिंक्य शेवाळे, शंतनू पोंक्षे, आकाश पांढरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोट
05416
आपला देश हा तरुणाईचा देश आहे. १८ ते २५ वयोगटच्या लोकसंख्येत आपण जगभरात एक नंबरला आहोत. ज्या तरुणांच्या हातात हा देश जाणार आहे, त्या तरुणांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्यरत राहावे. तरच भविष्यात हा देश आणखी प्रगती करीत राहील व जगात एक नंबरला राहील. ‘यिन’ समीटसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने हा उपक्रम राबविला, तो खरोखरच प्रेरणादायी आहे. असेच उपक्रम ‘सकाळ’ने घ्यावेत. जेणेकरून तरुणांना ऊर्जा, व्यासपीठ मिळेल.
- शिल्पा दरेकर, उपायुक्त, कोल्हापूर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT