कोकण

तेर्सेबांबर्डेत आज बैलगाडी शर्यत

CD

तेर्सेबांबर्डेत आज
बैलगाडी शर्यत
कुडाळ ः येथील शेतकरी बैलगाडी चालक-मालक संघटना, भाजप युवा मोर्चा कुडाळ व विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्ग पुरस्कृत भव्य जिल्हा व राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीचे आयोजन तेसेबांबर्डे येथे उद्या (ता. ३०) सकाळी अकराला केले आहे. ही शर्यत मुंबई-गोवा महामार्गानजीक हॉटेल साईप्रसाद नजीक होणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अनुक्रमे २५ हजार, १२ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये बक्षिसांसह आकर्षक ढाल, जिल्हास्तर स्पर्धेसाठी ११ हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये, आकर्षक ढाल तसेच सहभागी बैलजोडीस पाच किलो पेंड देण्यात येणार आहे. उत्कृष्ट जॅकी व उत्कृष्ट बैलजोडीसाठी पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी शैलेश देऊलकर, वैभव नाटकर येथे संपर्क साधावा, असे आवाहन युवा मोर्चा पदाधिकारी रुपेश कानडे, पप्या तवटे यांनी केले आहे.
---
निवती किल्ल्यावर
स्वच्छता मोहीम
सावंतवाडी ः दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागातर्फे निवती किल्ल्यावर (ता. वेंगुर्ले) रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्वच्छता मोहिमेत व्यापलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुजाची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेसाठी संतोष पारधी यांनी सॉ कटर उपलब्ध करून दिला. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश नाईक, समील नाईक, पंकज गावडे, शिवाजी परब, योगेश येरम, शीतल नाईक, विशाल परब, धोंडी परब, यश परब, सतीश नाईक, सदा घाडी, अक्षय सावंत, मयुरी जोशी आदींनी सहभाग घेतला. दुर्ग मावळा परिवाराने सर्वांचे आभार मानले.
---------------
घोटगेत शेतकऱ्यांना
बियाण्यांचे वाटप
कुडाळ ः घोटगे ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांना सुधारीत भात बी-बियाणे व शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच चैताली ढवळ यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या या मार्गदर्शन शिबिराला गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाताची मशागत कशी करावी, जेणेकरून आपले भात उत्पन्न वाढेल व सेंद्रीय पद्धतीने शेती कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळच्या कृषी अधिकारी सौ. परब यांनी भातशेतीची लागवड कशी करावी याबद्दल माहिती दिली. सरपंच ढवळ यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद माजी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उपसरपंच सचिन तेली, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गुरव, विजय नाईक, रमाकांत कोरगावकर, अनुसया ढवळ, लतिका गुरव, शिला मान्येकर, दीपाली सावंत, जयश्री मडवळ, ग्रामसेवक भोगले आदी उपस्थित होते.
--
थकबाकीदारांसाठी
‘अभय’ योजना
सिंधुदुर्गनगरी ः व्हॅट, बीएसटी, सीएसटी कायद्यांतर्गत असलेल्या थकबाकीतून मुक्त होण्यासाठी ३० जून २०१७ पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकीसाठी १ मे ते ३१ ऑक्टोबरपर्यंत अभय योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; चेन्नईची मदार जडेजावरच

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT