कोकण

मोती तलावाचे सौंदर्य जपा

CD

swt2913.jpg
05696
बबन साळगावकर

मोती तलावाचे सौंदर्य जपा
बबन साळगावकरः मजबुतीकरणाचे काम घिसाडघाईने
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः येथील मोती तलावाचे बांधकाम करत असताना त्याचे सौंदर्य जपा. तलावाचे डबके होऊ देऊ नका, अशी विनंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रसिध्दीपत्रकातून प्रशासनास केली आहे. त्या ठिकाणी बांधकाम खात्याचे अधिकारी फक्त मजबुती करण्याच्या नावाखाली भिंती घालण्याचे काम करत आहेत. मात्र, दर्जा जपण्यासाठी कोणीही लक्ष देत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त करीत मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःहून याकडे लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्र दिले आहे. त्यात असे नमूद केले आहे की, मोती तलाव मजबुतीकरणाचे काम घिसाडघाईने सुरू आहे. बांधकाम करत असताना तलावाचे सौंदर्य जपले जात नसून बांधकाम खात्याचे अधिकारी त्याचे डिझाईन न बनवता फक्त मजबुती करण्यासाठी भिंत घालत आहे. या दर्जाकडेही कुणाचाही लक्ष नाही. तलावाचे डबके बनवण्याचे काम सुरू आहे. तलाव सर्व बाजूंनी लहान लहान करत त्याच डबकं होत चालला आहे. मोती तलाव हे शहराचे हार्ट ऑफ द सिटी म्हणून मानले जाते या तलावाचे बांधकाम करत असताना त्याचा गोलाकार आकार जपणे आवश्यक होते. परंतु, तसे नव्हता बांधायची म्हणून भिंत बांधून मजबुतीकरण सुरू आहे. मंत्री केसरकर यांनी या कामाच्या दर्जा आणि तलावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही तसेच तलावाची लांबी रुंदी आणि गोलाकार जपला जाईल, याकडे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्ष देऊन काम करण्याची विनंती साळगावकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Audio Clip : मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर ठाकरे गटातील बड्या नेत्याची एन्ट्री, म्हणाले कुवत पाहा

टाइगर श्रॉफच्या शूटिंग प्रकरणात मोठी अपडेट! टीव्ही न्यूजच्या आधारे शूटर्सना मास्टरमाइंडच्या सूचना, ११ जणांना अटक

'जी आग लागायची ती लागली', राज ठाकरेंची सरकारवर खरमरीत टीका, 'लाव रे तो व्हिडिओ' मालिकेतील जुना व्हिडिओ पुन्हा शेअर करत म्हणाले...

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

SCROLL FOR NEXT