कोकण

लोकसहभागातून बियाणे बँक बनवा

CD

05715
सिंधुदुर्गनगरी ः हळद लागवड नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण. शेजारी आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

लोकसहभागातून बियाणे बँक बनवा

पालकमंत्री चव्हाण; सिंधुदुर्गनगरीत हळद लागवड नियोजन बैठक

सिंधुदुर्गनगरी, ता. २९ : जिल्ह्यात हळदीचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हळदीची रोपे, कंद हे योग्य भावात मिळायला हवीत. त्यासाठी लोकसहभागातून बियाण्यांची बँक बनवा, असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हळद लागवड नियोजन बैठक आज घेण्यात आली. बैठकीला आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
प्रभारी कृषी विकास अधिकारी विरेश अंधारी यांनी संगणकीय सादरीकरण करून माहिती दिली. सध्या जिल्ह्यात २५० हेक्टर हळद लागवड क्षेत्र असून ते २ हजार हेक्टरवर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जाणार आहे. शिवाय फोंडाघाट येथे २ लाख २० हजार हळद रोपे तयार केली आहेत, अशी माहिती अंधारी यांनी दिली. पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे मिळणे आवश्यक आहे. चढ्या भावाने त्याची विक्री होणार नाही. यासाठी बियाण्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवा. ‘मागेल त्याला हळद रोपे’, असा उपक्रम सुरू करा. त्यासाठी लोकसहभागातून बियाणे बँक बनवा. शिवाय मागील वर्षी उत्पादन झालेल्या हळदपूड खरेदीसाठी व्यवस्था करून हळद लागवडीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT