कोकण

राजापूर ः राजापूर डेपोसमोर भुयारी मार्ग करा

CD

फोटो ओळी
-rat३०p२६.jpg ः KOP२३M०५९००
राजापूर ः महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाबाबत रवींद्र चव्हाण यांना माहिती देताना रवींद्र नागरेकर.

राजापूर डेपोसमोर भुयारी मार्ग करा
भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी ; मंत्री रवींद्र चव्हाणांकडून पाहणी

राजापूर, ता. ३० ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली. त्यांनी आज तालुक्यासह शहरातील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, एसटी डपोसमोरील रहदारीच्या भागामध्ये होणारे संभाव्य अपघात लक्षात घेता या ठिकाणी अंडरपास (भुयारी मार्ग) रस्ता व्हावा, बावकर हॉस्पिटलसमोर लोकांना ये-जा करण्यासाठी ओव्हरब्रिज अथवा पर्यायी मार्ग करण्यात यावा, अशा मागण्या भाजपच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाद्वारे केल्या. या वेळी भाजपच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना आपल्या निवेदनांसह एसटी डेपोसमोर भुयारी मार्ग उभारण्याच्या मागण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासित केले.
भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव आणि सहकार्‍यांनी स्वागत केले. या वेळी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार विनय नातू, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस शिल्पा मराठे आदी उपस्थित होते.
शहरातील एसटी डेपोसमोरील महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाडीवस्ती आणि लोकवस्ती मोठ्या संख्येने वसलेली आहे. या परिसरातून शाळा, महाविद्यालयामध्ये जाणार्‍या शाळकरी मुलांसह बाजाररहाट करणारे तसेच शासकीय कामानिमित्ताने जा-ये करणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी लोकांसह वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सद्यःस्थितीमध्ये आहे त्याप्रमाणे रस्ता झाल्यास या परिसरामध्ये वारंवार अपघात होण्याचा संभव असल्याने या ठिकाणी अंडरपास रस्ता व्हावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष गुरव यांनी निवेदनाद्वारे केली.
बावकर हॉस्पिटलच्या येथे महामार्गाच्या अलिकडे आणि पलिकडे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वसलेली असून या परिसरामध्ये शाळा, अंगणवाड्या आहेत. त्यामुळे बावकर हॉस्पिटलसमोर ओव्हरब्रिज अथवा पर्यायी मार्ग करावा, अशी माजी उपनगराध्यक्ष शीतल पटेल यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT