कोकण

‘शासन आपल्या दारी’साठी एसटी सेवा

CD

05944
कणकवली : येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्‍या बैठकीत शासन आपल्‍या दारी उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’साठी एसटी सेवा

कणकवली तहसीलदार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ

कणकवली, ता.३० : ‘शासन आपल्‍या दारी’ या उपक्रमाचा प्रारंभ ६ जून रोजी सावंतवाडी अथवा कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला जाणाऱ्या नागरिकांसाठी प्रत्‍येक तालुक्‍यातून एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहेत. तहसीलदार रमेश चव्हाण यांनी आज ही माहिती दिली.
‘शासन आपल्‍या दारी’ कार्यक्रम नियोजनाची बैठक येथील पंचायत समितीच्या सभागृहात झाली. यात तहसीलदार रमेश पवार यांनी नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल पाटील, तालुका कृषी अधिकारी व्ही एम मुळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले, सहाय्यक गटविकास अधिकारी सूर्यकांत वारंग, विस्तार अधिकारी किशोर गवस आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये गावागावांमधून सोडल्या जाणाऱ्या एसटीच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. एका ग्रामपंचायतीमधून २० अथवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना तसेच लाभार्थ्यांना या उपक्रमाच्या प्रारंभाला नेण्याबाबत ग्रामस्तरीय समितीने नियोजन करावे, अशा सूचना तहसीलदारांनी दिल्या.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच योजनांची माहिती एका ठिकाणी मिळावी व जनतेला शासन पातळीवर हेलपाटे मारावे लागू नये यासाठी हा उपक्रम राज्‍य शासनाने हाती घेतला आहे. कणकवली तालुक्यातील एका गावातून किमान २० तर ग्रामविकास अधिकारी स्तरावरील ग्रामपंचायतीमधून किमान ४० असे लाभार्थी या कार्यक्रमस्थळी नेण्याबाबत सूचना तहसीलदारांनी दिल्‍या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT