कोकण

इन्फिगो थ्रीडी आय क्लिनिकचा आज लांजात आरंभ

CD

इन्फिगो थ्रीडी आय क्लिनिकचे
आज लांजा येथे उद्घाटन
पालकमंत्री सामंतांची उपस्थिती ; अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध
लांजा, ता. ३१ः लांजा येथे इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलचा अत्याधुनिक बाह्यरुग्ण विभाग (थ्रीडी आय क्लिनिक) सुरू होत आहे. याचे उद्घाटन गुरूवारी (ता. १) जूनला सकाळी ९.३० वा. पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील नामांकित डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. महाराष्ट्रभर या हॉस्पिटलच्या विविध शहरांमध्ये शाखांची शृंखला आहे. दिवसेंदिवस हा विस्तार वाढतच आहे. या माध्यमातून अत्याधुनिक व अद्ययावत नेत्रसेवेची संधी रुग्णांना उपलब्ध केली आहे. लांजा तालुक्यातील जनतेची मागणी व गरज लक्षात घेऊन इन्फिगो ग्रुपने लांजा येथे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. अशा सुविधेची कमतरता ओळखूनच अत्याधुनिक तंत्रज्ञान, समृद्ध आरोग्यसुविधा लांजा येथे उपलब्ध करून दिली आहे. शहरातील शेट्ये पेट्रोलपंपासमोरील मेरिगोल्ड कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे क्लिनिक सुरू होत आहे. या क्लिनिकमध्ये दरदिवशी नियमितपणे डोळ्यांच्या तपासणीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची व्यवस्था करण्यात आली आहे.
आठवड्यातील दर मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. या सोबतच या क्लिनिकमध्ये १२ तास डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणार आहे. टेलीव्हिडिओ कन्सल्टन्सीद्वारे ही सुविधा अत्याधुनिक फंड्स कॅमेऱ्याने उपलब्ध करण्यात आली आहे. डॉक्टरांचा तत्काळ सल्ला घेऊन त्याप्रमाणे या क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार केले जाणार आहेत. ही सुविधा या हॉस्पिटलने सर्वप्रथम लांजा या ठिकाणीच उपलब्ध केली आहे. इन्फिगोचे सर्व डॉक्टर तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध शिबिरे घेऊन लोकांच्या दरवाजापर्यंत पोहोचणार आहेत. चष्म्याचा अचूक नंबर, स्वस्त दरात देशी, इम्पोर्टेड फ्रेम्स उपलब्ध राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज व आधुनिक असा रेटिना विभाग इन्फिगो रत्नागिरी येथे आहे. आजवर हजारो रेटिनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. या वेळी तहसीलदार प्रमोद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, श्रीराम वंजारे, महंमद रखांगी, प्रसन्न शेट्ये, ॲड. अभिजित जेधे उपस्थित राहणार असल्याचे इन्फिगो आयकेअर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT