कोकण

पावसाअभावी पर्यावरणदिनी वृक्ष लागवड करू नका

CD

पावसाअभावी पर्यावरणदिनी
वृक्ष लागवड करू नका
शेतकरी जैन यांची मागणी ; कार्यक्रम फोटोपुरता मर्यादित
दाभोळ, ता. ३१ ः जागतिक पर्यावरणदिनी ५ जूनला कोकणात वृक्ष लागवड न करता पर्यावरणपूरक कार्यक्रम करावेत, अशी मागणी आंजर्ले येथील प्रगतिशील शेतकरी राजेश जैन यांनी शासनाकडे केली आहे.
कोकणात पाऊस ७ जूनला सुरू होतो. बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून कदाचित तो पुढेही जाऊ शकतो. अनेक नर्सरीचे मालक पाऊस पडल्यानंतरच झाडे देण्यास सुरवात करतात. ५ जून हा जागतिक पर्यावरणदिन आहे. भारतीय पर्यावरणदिन नाही, हे मुळात सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. जमीन खालून ६ ते ९ इंच ओली झाल्याशिवाय वृक्षारोपण करूच नये, हा साधा व सोपा नियम आहे. राजकीय नेते व अनेक संस्थांचे पदाधिकारी या दिवशी वृक्षारोपण करतात. तो कार्यक्रम फोटोपुरता मर्यादित असतो. यातील एकही झाड जगत नाही उलट आपण जिवंत झाड दुसरीकडे लावून ते जगवण्याऐवजी त्यांना मारायचंच काम करतो. कोणती झाडे कोणत्या भागात लावावीत याचाही विचार करायला हवा व झाड लावताना त्याच्या बाजूला अजून एक तेवढाच खड्डा मारावा जेणेकरून आजूबाजूचा पालापाचोळा त्यात जमा होईल व भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. रत्नागिरी जिल्ह्याची भूजलपातळी झपाट्याने कमी होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे, याचाही पर्यावरणप्रेमींनी विचार करावा. फलधारणेसाठी अत्यावश्यक असलेल्या मधमाशीचे संवर्धन ही काळाची सर्वात मोठी गरज असून, या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. प्रचंड प्रमाणात होत असलेली जंगलतोड, बिनशेती प्लॉट करताना ग्रीन झोनकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे होत असेलेले दुर्लक्ष, यामुळे वाढत चाललेल तापमान या सर्व गोष्टींकडे प्रत्येक सुजाण नागरिकांनी जागे होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT