कोकण

राजापूर - गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू सेवानिवृत्त

CD

फोटो ओळी
- rat३१p१५.jpg ःM०६१४२ राजापूर ः सेवानिवृत्त झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांचा सत्कार करताना कृषी अधिकारी सुहास पंडित.
-------------
गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू सेवानिवृत्त

राजापुरात कार्यक्रम ; न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः जन्मभूमीमध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करताना सर्वांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, कर्मचारी आणि कुटुंब आदी सार्‍यांचेच मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद, असे सांगत सेवानिवृत्त झालेले गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी विवेक गुंड, माजी सभापती कमलाकर कदम, माजी जि. प. सदस्य आबा आडिवरेकर, कृषी अधिकारी सुहास पंडित यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कडू यांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासह सेवानिवृत्त विस्तार अधिकारी भास्कर गुरसाळे, प्रशासकीय बदली झालेले अधीक्षक झोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कडू यांच्यासह अन्य सेवानिवृत्त झालेले अधिकारी, शिक्षक आदींच्या शुभेच्छा समारंभाचे पंचायत समितीच्या किसानभवन सभागृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. या वेळी विस्तार अधिकारी उत्तम भोसले, प्रकाश पाध्ये यांच्यासह केंद्रप्रमुख, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी कडू म्हणाले, क्लार्क या पदापासून नोकरीला आरंभ केल्यानंतर शिक्षणक्षेत्रातील गटशिक्षणाधिकारी पदापर्यंतच्या विविध पदांवर काम केले. त्यामध्ये मिळालेल्या अनुभवाचा गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करताना उपयोग झाला. या सार्‍या प्रवासामध्ये सार्‍यांचे मिळालेले प्रेम आणि सहकार्य निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT