कोकण

वेंगुर्लेत विकासकामांचा उपायुक्तांकडून आढावा

CD

विकासकामांचा
वेंगुर्लेत आढावा
वेंगुर्लेः कोकण विभागाचे नगरविकास उपायुक्त रवींद्र जाधव व नगरपरिषद संचनालय मुंबईचे उपायुक्त शंकर गोरे यांनी बुधवारी (ता. ३१) येथील नगरपरिषदेस भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विकास प्रकल्पांना भेटी देऊन कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या भेटीत त्यांनी वेंगुर्ले पालिकेचा धनकचरा प्रकल्प, शहरातील गार्डन, मल्टिपर्पज हॉल, बंदर सुशोभीकरण वगैरे प्रकल्पांना भेटी दिल्या. त्यानंतर बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला.
...................
''न्हिवे'' नळयोजनेचा
कोळंबसाठी पर्याय
मालवणः कोळंब गावाला पाणीटंचाई निवारणासाठी न्हिवे येथील नळयाजनेच्या स्रोतांवरून पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना केली आहे. या पत्रात उपजिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांना कोळंबला पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही तत्काळ करावी, असेही म्हटले आहे. तहसीलदारांनी कोळंबला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची मागणी केल्याचे पत्र आणि गटविकास अधिकारी व आपला संयुक्त पाहणी व सहीचा अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठविला होता. संयुक्त अहवालात कोळंब व न्हिवे या गावासाठी एक सार्वजनिक विहीर असून ही विहीर पूर्णत: कोरडी पडल्यामुळे गावाला टँकरने पाणीपुरवठ्याची विनंती करण्यात आली होती.
..................
कोंडये नदीवरील
पुलाची दुरुस्ती करा
कणकवलीः कोंडये येथील झिरो पॉईंट ते तेलीवाडी करंजे रस्त्यावरील कोंडये नदीवरील पूल नादुरुस्त झाला आहे. या पुलाची पावसाळ्यापूर्वी तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी कोंड्ये गावचे माजी सरपंच अनिल मेस्त्री व ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोंड्ये येथील झिरो पॉईंट ते तेलीवाडी करंजे रस्त्यावर श्री पावणादेवी मंदिराजवळ कोंड्ये धरण बंधारा येथे नदीवर बांधलेल्या पुलाच्यावर जे काँक्रिट घालण्यात आले आहे, त्याच्या सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. शिवाय याची वेळेत दुरुस्ती झाली न झाल्यास आणखी सळ्या बाहेर येऊन पूल कमकुवत होईल. या रस्त्यावर वाढलेली रहदारी पाहता पुलाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. जिथे सळ्या बाहेर आल्या आहेत, त्यावर तत्काळ काँक्रिट घालण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
...............
वाहनाच्या धडकेने
लांडग्याचा मृत्यू
दोडामार्गः दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावरील मणेरी येथे मंगळवारी (ता. ३०) रात्री अनोळखी वाहनाने एका लांडग्याला धडक दिली. त्यात तो मृत्युमुखी पडला. ही घटना पत्रकार समीर ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती दोडामार्ग वनक्षेत्रपाल अरुप कन्नमवार यांना दिली. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी येत पाहणी करून लांडग्याला मृत घोषित केले. त्यानंतर विभागाकडून रीतसर पंचनामा करून विच्छेदनानंतर दहन करण्यात आले.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT