कोकण

प्रियांका गावडे, सुप्रिया जाधव यांचा सन्मान

CD

swt16.jpg
06286
निरवडेः प्रियांका गावडे यांना पुरस्काराने सन्मानित करताना सरपंच, उपसरपंच आदी.

प्रियांका गावडे, सुप्रिया जाधव यांचा सन्मान
ग्रामपंचायतीचा पुढाकारः निरवडेत अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः निरवडे येथील पंचायत समिती माजी सभापती प्रियांका गावडे व माजी सरपंच सुप्रिया जाधव यांना ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील ६३ गावांमधून गावडे व जाधव यांची या पुरस्काराची निवड करण्यात आली. त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
निरवडे ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी गावडे, अंगारिका गावडे, आनंदी पवार, कृषी सहाय्यक सावंत, कृषी अधिकारी देसाई, तलाठी कुडतरकर, महिला व बालविकास अधिकारी मोरे, निरवडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका पास्ते आदींसह सीआरपी, आशा, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन ग्रामविस्तार अधिकारी सुनीता कदम यांनी, प्रास्ताविक मोरे यांनी केले. सरपंच गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. धर्माजी गावडे यांनी पुरस्काराविषयी विस्तारपूर्वक मार्गदर्शन केले. पुरस्कार विजेत्या गावडे आणि जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने कृषी अधिकारी देसाई आणि सावंत कृषी विषयक काही प्रात्यक्षिक दाखवित भात पीक लागवडीविषयी विशेष मार्गदर्शन केले. बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेचे व्यवस्थापक यांनी विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले. निरवडे येथील बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी प्रियंका गावडे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT