कोकण

पुरुषांत राहुल भस्मे, कुमार गटात ओम मोरे विजयी

CD

फोटो ओळी
-rat१p१८.jpg- KOP२३M०६३२० लांजा ः जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेतील विजेते खेळाडू.
-----------

पुरुषांत राहुल भस्मे, कुमार गटात ओम मोरे विजयी

जिल्हा कॅरम स्पर्धा ; कुमारी गटात आकांक्षा कदमचे वर्चस्व

लांजा, ता. १ ः येथे झालेल्या जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये राहुल भस्मे तर कुमार गट एकेरीत ओम मोरे आणि कुमारी गटात आकांक्षा कदमने वर्चस्व राखले.
तालुक्यातील भांबेड श्री समर्थ कृपा, स्पोर्टस क्लब आयोजित जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा कुणबी सेवा संघ हॉलमध्ये झाली. या स्पर्धेच्या उद्घाटनाला सौ. शमा तोडगे, अध्यक्ष प्रदिप भाटकर, विकास इंदुलकर, प्रमुख पंच साईप्रकाश कानिटकर, मनोज जाधव, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, मिलींद साप्ते, विवेक देसाई. राहुल बर्वे आणि खेळाडु उपस्थित होते. या स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये अंतिम फेरीत अभिजित खेडेकर-दीपक वाटेकर या जोडीने संजय कोंडविलकर-योगेश कोंडविलकर यांच २५-०५,०८-२२,२५-०१ असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीमध्ये अंतिम फेरीत राहुल भस्मेने योगेश कोंडविलकर ०१-१३, २५-१३,२२-१४ असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत राहुल भस्मेने अभिजित खेडेकरचा २५-१२,२५-०० तर योगेश कोंडविलकरने सुरज आडीवरेकरचा २५-०९,२५-०० यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कुमार गट एकेरीत ओम मोरेने द्रोण हजारेचे ९-०८, ००-२३, २२-०५ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. कुमारी गटात एकेरीमध्ये आकांक्षा कदमने निधी सप्रेच २५-००,२५-०० सरळ सेटमध्ये पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

Chhatrapati Sambhajinagar: संलग्नीकरणाची शुल्कवाढ स्थगित; चार सदस्यीय समिती स्थापन, पुढील बैठकीत होणार निर्णय

SCROLL FOR NEXT