कोकण

फोटोसंक्षिप्त-परब, हरमलकर यांचा न्हावेली येथे सन्मान

CD

फोटोसंक्षिप्त

०६३५८
परब, हरमलकर यांचा
न्हावेली येथे सन्मान
सावंतवाडी : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्याच्या वतीने ग्रामपंचायतस्तरावर जाहीर केलेला पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार न्हावेली ग्रामपंचायतीच्या वतीने बचतगटाच्या माध्यमातून उकृष्ट काम केल्याबद्दल रुपाली परब व सानिया हरमलकर या महिलांना देण्यात आला. सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले. सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच संतोष नाईक, ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, स्नेहा पार्सेकर, आरती माळकर, ग्रामसेवक तृप्ती राणे, ग्रामस्थ दीपक नाईक, भावना धाऊसकर, गितेश परब, आत्माराम नाईक, संतोष निर्गुण, विनायक कालवणकर आदी महिला व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

महावितरणतर्फे
ग्राहकांना आवाहन
सावंतवा़डी ः पावसाळ्याच्या दिवसांत वादळी वाऱ्याने वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते. नागरिकांनी वीज यंत्रणेतील तुटलेल्या तारा, वीज खांबास स्पर्श करणे टाळावे. अशा स्थितीत ग्राहकांनी वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. धोकादायक वीज यंत्रणेची सूचना तत्काळ नजीकच्या महावितरणच्या कार्यालयास द्यावी. आपत्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास संयम राखून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT