कोकण

रत्नागिरी ः क्राईम पट्टा

CD

पान ३ साठी)

अपघातप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील पानवल बौद्धवाडी-बुद्धविहार बसस्टॉप येथे वळण घेताना भितींला धडक बसून झालेल्या अपघातात एसटी चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यकांत रामदास राजेशिर्के असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालक राजेशिर्के हे रत्नागिरी ते पानवल घवाळीवाडी एसटी (एमएच २० बीएल १६६१) ही घेऊन जात होते. पानवल बुद्धविहार बसस्टॉपजवळ चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि तेथील वळणावर तक्रारदाराच्या भिंतीला धडक दिली. यामध्ये चालकासह वाहक दीपाली नारायण भायजे यांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

खंडाळा येथील एकाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील खंडाळा येथील प्रौढाला चक्कर आल्याने उपचारासाठी त्याला प्रथम खासगी रुग्णालय व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. श्रीकांत वसंत राव (वय ५३, रा. खंडाळा, मूळ ः कारवार-गोवा) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३० मे ) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकांत राव यांना चक्कर आल्यासारखे वाटत होते म्हणून डॉक्टरला बोलावले होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घोडवली फाटा येथे अवैध गावठी दारू जप्त
रत्नागिरी ः देवरूख-घोडवली फाटा (ता. संगमेश्वर) येथे घरामागे विनापरवाना हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत २ हजार ८०० रुपयांची ५० लिटर दारु जप्त केली. देवरुख पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाडुरंग सखाराम झोरे असे त्या संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३१) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास तुळसणी-घोडवली फाटा येथील एका घराच्या पाठीमागे आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुळसणी-घोडवली फाटा येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी ५० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Junnar News: 'ड्रंक अँड ड्राईव्ह आरोपींना आर्थिक दंडाबरोबर दोन वृक्ष लावण्याचा आदेश'; लोकन्यायालयातील पर्यावरणपूरक निर्णयाचे होतेय कौतुक

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT