कोकण

कणकवली समर्थनगर येथे बेपत्ता तरूणाचा मृतदेह

CD

कणकवली समर्थनगर येथे
बेपत्ता तरूणाचा मृतदेह

कणकवली, ता.३ : भिरवंडे खलांतर-वरचीवाडी येथील बेपत्ता महेश दत्ताराम सावंत (वय ४०) यांचा मृतदेह आज शहरातील समर्थनगर येथील गडनदीकिनारी भागात आढळला. हा मृतदेह कुजलेल्‍या स्थितीत होता. या घटनेची नोंद येथील पोलिसांत झाली.
शहरातील समर्थनगर भागात अनोळखीचा मृतदेह असल्‍याची माहिती येथील गुराख्यांनी आज पोलिसांना दिली होती. त्‍यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्‍यात घेऊन उपजिल्‍हा रूग्‍णालयात पाठवला होता. त्‍यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. यात महेश सावंत हा २३ मे पासून बेपत्ता असल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे त्यांच्या नातेवाईकांना ओळख पटविण्यासाठी बोलाविले. महेशचे चुलते अशोक विश्राम सावंत (वय ६९) यांनी मृतदेहाची ओळख पटविली.
मृत महेशचे वडील आणि दोन भाऊ मुंबई-भांडूप येथे राहतात. महेशला दारूचे व्यसन होते. कणकवली तालुक्‍यात कोठेही मोलमजुरी करून तो उदरनिर्वाह करत असे. केव्हातरी तो भिरवंडेतील आपल्‍या गावी येत होता, अशी माहिती त्‍याच्या चुलत्यांनी दिली. २३ मे रोजी तो गावी आला. वडिलांना भेटून पुन्हा कणकवलीला गेला. त्‍यानंतर तो पुन्हा भिरवंडेला आला नसल्‍याचीही माहिती सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT