कोकण

नाट्यप्रयोगातून प्राप्त रक्कम आईच्या उपचारासाठी सुपूर्त

CD

07004
मालवण ः विराज माळगावकर यांच्या आईच्या उपचारासाठी दशावतारी कलाकारांनी नाट्यप्रयोग आयोजित करत मदत निधी गोळा केला.


नाट्यप्रयोगातून प्राप्त रक्कम
आईच्या उपचारासाठी सुपूर्त
मालवण, ता. ४ : चौके येथे वावळ्याचे भरड येथे विराज माळगावकर यांच्या आईच्या उपचारास मदत उपलब्ध करून देण्यासाठी अजित प्ररब, मामा माळकर यांच्या संकल्पनेतून संयुक्त दशावतारी नाटक सादर केले. यातून मिळालेल्या बक्षीसासह एकाही कलाकाराने मानधन न घेता ती सर्व रक्कम मदत निधीसाठी देत माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले.
आईच्या आजारपणासाठी विराज माळगावकर यांना आर्थिक मदतीची गरज होती. याची माहिती मिळताच दशावतार कलावंत मामा माळकर, अजित परब यांनी चौके येथे दशावतारी नाट्यप्रयोग करण्याचा निर्णय घेतला. या प्रयोगातून जमा झालेला, बक्षीस म्हणून मिळालेले पैसे तसेच कलाकारांनी कोणतेही मानधन न घेता ती सर्व रक्कम मदत निधीसाठी दिली. यात बबलू मेस्त्री, ओमप्रकाश चव्हाण, रोहन चव्हाण, रोशन चव्हाण, शशांक गावठे, समीर परब, अजित परब, गोट्या चव्हाण, प्रतीक राणे, निलेश सुतार, बाळू बाणे, संदेश परब, प्रथमेश परब (पिपलो) तसेच वावळ्याचे भरड भराडी कला, क्रीडा विकास मंडळ चौके यांचे मोठे सहकार्य लाभले. या सर्वांचे बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळातर्फे श्री. माळकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT