कोकण

एसटी महामंडळातर्फे उत्तम सेवा

CD

07024
मालवण ः एसटी महामंडळाच्या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते करण्यात आले.

एसटी महामंडळातर्फे उत्तम सेवा

डॉ. सुभाष दिघे; मालवण आगारात वर्धापन

मालवण, ता. ४ : दुर्गम भागात खेड्या पाड्यात अहोरात्र सेवा बजावून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे आपले ब्रीदवाक्य सार्थकी लावण्याचे काम एसटी महामंडळ करत आहे. एसटी महामंडळाच्या ७५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला तर एक उत्तम चाललेली सेवा म्हणजे एसटी महामंडळ आहे, असे दिसून येईल. महामंडळाच्या या कार्याला सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७५व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे उद्‍घाटन मालवण आगारातर्फे येथील बसस्थानकावर ज्येष्ठ डॉ. दिघे यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे बाळासाहेब माणगावकर, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, मालवण आगार व्यवस्थापक स्वप्नील गडदे, लेखाधिकारी पवार, पत्रकार अमित खोत, कांता चव्हाण, दिलीप हिंदळेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी आगार व्यवस्थापक स्वप्नील गडदे यांनी स्वागत केले. तर कांता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रफुल्ल देसाई यांनी गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी ही संकल्पना घेऊन महाराष्ट्रासह इतर राज्यात एसटी महामंडळाची लालपरी धावत आहे. खेड्या पाड्यातील जनतेची लाईफ लाईन म्हणून काम करणारी एसटी आपला अमृत महोत्सव साजरा करताना विविध समस्यांमधून वाट काढीत प्रवाशांची सेवा करत आहे. एसटीची ही सेवा अधिक सक्षम पणे कार्यरत राहो, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. माणगावकर यांचे समायोचित भाषण झाले. दिलीप हिंदळेकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT