कोकण

तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीत सायकल रॅली

CD

rat४p८.jpg-
०६९६८
रत्नागिरीः तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे समादेशक कॅ. दिनेश टामटा सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवताना.

तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीत सायकल रॅली
रत्नागिरी, ता. ४ : पर्यावरण संवर्धनाच्या वचनबद्धतेला प्रत्यक्षात उतरवित भारतीय तटरक्षक दलाने रत्नागिरी येथे ०२ जून २३ रोजी सकाळी रत्नागिरी शहराच्या हद्दीत १० किमी सायकल रॅलीचे उत्साहात आयोजन केले. या कार्यक्रमात तटरक्षक अवस्थान रत्नागिरी, तटरक्षक वायु अवस्थान रत्नागिरी आणि एनसीसी युनिट यांच्या एकूण ३० सायकलस्वारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे समादेशक (क श्रे) दिनेश टामटा यांनी आपल्या कार्यालयाच्या प्रांगणातून हिरवा झेंडा दाखवून केली.
सायकल रॅलीचा उद्देश स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त पर्यावरणाबाबत जनजागृती करणे हा होता. या रॅलीचा मार्ग मारुती मंदिर, जेके फाइल्स, एमआयडीसी परिसर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणावरून परत तटरक्षक कार्यालय असा होता. रॅलीदरम्यान प्रदूषणाचे हानिकारक परिणाम आणि पर्यावरणपूरक पद्धती अवलंबण्याचे फायदे याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बॅनर आणि फलक प्रदर्शित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT