कोकण

विद्यार्थ्यांच्या आधार वैधतेसाठी 15 जूनची डेडलाईन

CD

आधार वैधतेसाठी
१५ जूनची डेडलाईन
रत्नागिरी, ता. ५ः विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वैधतेसाठी १५ जूनची मुदत दिली आहे. आधार नोंदणीत त्रुटी निर्माण झाल्यास प्रत्यक्ष पडताळणी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. वाढीव मुदत मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठीची संचमान्यता आधार वैधतेनुसार करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार गेले वर्षभर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील तपशिलातील त्रुटी दुरूस्त करणे आदी प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र विद्यार्थ्यांची आधार कार्ड अवैध ठरत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे अद्यापही आधार कार्ड नसल्याचे दिसून आले आहे.
आधार वैधतेनुसार संचमान्यता केल्यास आणि विद्यार्थीसंख्या कमी झाल्यास शिक्षकांची पदे कमी होण्याची भिती आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्य मंडळात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. त्यात आधार वैधतेसाठी १५ जूनची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आधार पडताळणीनुसार संच मान्यता करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर २०२२ हा दिनांक गृहीत धरून आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येवर संचमान्यता करताना संस्थेने काही तफावत निदर्शनास आणून दिल्यास एक स्तर वरिष्ठ अधिकार्‍याने शहनिशा करून निर्णय घ्यावा. तसेच सबंधित प्रकरणे शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT