कोकण

हुंबरवणेवाडीतील शेवटच्या घरापर्यंत रस्ता व गाडी जाणार

CD

rat5p4.jpg
07163
लांजाः खासदार विनायक राऊत यांचा पालू, चिंचुर्टी, हुंबरवणेवाडी येथील ग्रामस्थांनी सत्कार केला.
--------
हुंबरवणेतील शेवटच्या घरापर्यंत रस्ता
खासदार विनायक राऊत; रस्त्यासाठी अडीच कोटीचा निधी
लांजा, ता. ६ः हुंबरवणेवाडीतील शेवटच्या घरापर्यंत रस्ता व गाडी जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान मिळेल आणि तो दिवस काही दूर नाही, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा) गटाचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
लांजा तालुक्यातील पालू, चिंचुर्टी, हुंबरवणेवाडी रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना खासदार विनायक, आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्या वेळी खासदार राऊत बोलत होते. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, महिला शहर संघटक छाया गांगण, ग्राहक संरक्षण कक्षाचे रत्नागिरी जिल्हा संघटक दत्ता कदम, युवासेनेचे जिल्हाप्रमुख विनय गांगण, ग्राहक संरक्षण कक्षाचे तुषार लांजेकर उपस्थित होते. तालुक्याच्या पूर्व भागात वसलेल्या चिंचुर्टी, हुंबरवणेवाडीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने खासदार राऊत यांनी या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. खासदार राऊत यांनी पावसाच्या आधी जेवढा जास्तीत जास्त रस्ता करता येईल तेवढा करा, अशा सूचना ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पावसाळ्यानंतर मात्र नॉनस्टॉप काम करण्यात येईल. वाडीत रस्ता झाला, पाणी आलं की, अनेकांचे डोळे तुमच्या जमिनींकडे फिरतील; पण जमिनी विकू नका, अशी विनंतीदेखील खासदार राऊत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT