कोकण

खेडमध्ये शिवसेनेचे ''जोडो मारो'' आंदोलन

CD

rat5p8.jpg
ः07167
खेडः संतोष नलावडे यांना नियुक्तीपत्र देताना मनसेचे नेते वैभव खेडेकर सोबत पदाधिकारी.
--------------
मनसे जिल्हा सचिवपदी संतोष नलावडे
खेडः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनविसेचे अध्यक्ष अमित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सचिवपदी चिपळूणचे संतोष नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली. मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी कामगार सेना कार्याध्यक्ष संदीप कवळे, तालुका प्रवक्ते संभाजी देवकाते आदी उपस्थित होते.
------------
rat5p9.jpg
M07168
खेडः शहरातील तीनबत्ती नाका येथे ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
------
खेडमध्ये शिवसेनेचे ''जोडो मारो'' आंदोलन
खेड ः ठाकरे गटाचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीन बत्तीनाका येथे त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत निषेध नोंदवला. या वेळी खासदार राऊत यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाही दिल्या. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अरुण कदम, सचिन धाडवे, कुंदन सातपुते, महेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
----------------
rat5p10.jpg
07172
खेडः जगबुडी नदीकिनारी आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके दाखवताना गृहरक्षक दलाचे जवान.
--------------------------
खेडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके
खेडः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या आदेशानुसार, जिल्हा व्यवस्थापन प्रमुख अजय सूर्यवंशी व तालुका समादेशक संजय कडू यांच्या उपस्थितीत जगबुडी नदीकिनारी आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. टाकाऊ वस्तूपासून तयार केलेल्या साधनसामुग्रीने नैसर्गिक आपत्तीमध्ये आपला जीव कसा वाचवता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये पाण्याच्या रिकाम्या बॉटलचा, थर्माकॉलचा बेल्ट यासारख्या टाकाऊपासून उपलब्ध तराफा, ड्रमचा तराफा, हंडा-कळशी तराफा, केळीचे खुंट, सुकलेले नारळ साहित्यापासून दुसऱ्या व्यक्तीचा जीव कसा वाचवायचा याबाबत प्रात्यक्षिके केली. सीपीआर, उचल पद्धत, प्रथमोपचार स्ट्रेचर यासारखी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या प्रसंगी तालुका समादेशक अधिकारी संजय कडू, कंपनी कमांडर जितेंद्र पवार, वरिष्ठ पलटण नायक उदय मोरे, प्रशिक्षक पलटण नायक सचिन कडू, पलटण नायक रेश्मा दांडेकर, केतन पेवेकर, गणेश पुळेकर गृहरक्षक दलाचे जवान व आपती व्यवस्थापन ग्रुप सदस्य उपस्थित होते.
----------------
rat5p28.jpg
07312
जालगावः पर्यावरणदिनानिमित्त वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करताना पर्यावरणप्रेमी.
------------
आम्रपाली येथे वृक्षवल्लीचा वाढदिवस
दाभोळः जागतिक पर्यावरणदिनानिमित्त प्रशांत परांजपे यांनी आम्रपाली ग्राम सहवास या होम स्टेच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी विशेष सहलीचे आयोजन केले होते. मुक्त पत्रकार आणि वातावरण बदल या विषयातील तज्ज्ञ राधिका कुलकर्णी यांच्यासह अनेक पर्यटक खास निसर्गाची जवळून ओळख करून घेण्यासाठी त्यांच्या पर्यटन संकुलात आले होते. पर्यावरण दिनानिमित्त आम्रपाली येथे वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी मूळ आम्रवृक्षाला (रायवळ) सजवण्यात आले होते. औक्षण करण्यात आले आणि सेंद्रिय खताचा केक वृक्षवल्लीला देण्यात आला. या वेळी प्रशांत परांजपे यांनी वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षांचे संवर्धनही महत्वाचे असून वृक्ष आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांच संवर्धन महत्वाचं असून अशा प्रकारे दररोज पर्यावरणदिन साजरा करून धरणीमाता आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचं इवलं तरी योगदान असणं अत्यावश्यक असल्याचे सांगितले.
---------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT