कोकण

शाळकरी विद्यार्थ्यांनी केला बारसू सडा स्वच्छ

CD

rat6p8.jpg
07430
राजापूरः बारसू सडा परिसरातील गोळा केलेल्या कचऱ्यासमवेत शाळकरी मुले.
-----------
शाळकरी विद्यार्थ्यांनी
केला बारसू सडा स्वच्छ
पर्यावरण दिन ; प्लास्टिक कचऱ्याचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ः जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधत बारसू- सोलगाव परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सोमवारी (ता. ५) बारसूच्या सड्यावर एकत्र येत या सडा परिसराची स्वच्छता केली. विविध कारणांमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असताना पर्यावरण जतन आणि संवर्धनाच्या जाणिवेतून मुलांनी राबवलेल्या या अभियानाचे कौतुक केले जात आहे.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून तालुक्यातील बारसू परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या माती परीक्षणासाठी बोरवेल मारण्याचे काम शासनाकडून बारसू परिसरामध्ये गत महिन्यामध्ये करण्यात आले. या परीक्षणाच्या कामावरून प्रकल्प विरोधक ग्रामस्थ आणि पोलिस-प्रशासन यांच्यामध्ये संघर्षही पाहायला मिळाला होता. माती परीक्षणावेळी ग्रामस्थांसह पोलिस प्रशासनही बारसू सडा परिसरामध्ये दिवसरात्र तळ ठोकून होते. या कालावधीमध्ये सड्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्यांसह अन्य स्वरूपाचा कचरा टाकण्यात आला होता. हा प्लास्टिक कचरा पर्यावरणाला घातक ठरणारा आहे.
त्याचवेळी या परिसरामध्ये चारा खाण्यासाठी फिरणाऱ्या गुरांच्या जीविताच्यादृष्टीनेही धोकादायक ठरणारा आहे. त्यामुळे पर्यावरणीय आणि सामाजिक जाणिवेतून बारसू-सोलगाव परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी पर्यावरणदिनाचे औचित्य साधून सडा पसिररातील प्लास्टिक कचर्‍याचे संकलन केले. या उपक्रमाद्वारे सडा परिसराची स्वच्छता होताना पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या कचऱ्याचेही संकलन झाले. सामाजिक जाणिवेतून राबवण्यात आलेल्या या शाळकरी मुलांच्या प्लास्टिक कचरा संकलन उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT