कोकण

तळेरेतील देवराईत वृक्षारोपण, बी संकलन

CD

07459
तळेरे ः श्री गांगेश्वर मंदिर परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘निसर्गमित्र’ परिवारातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. (छायाचित्र : एन. पावसकर)

देवराईत वृक्षारोपण, बी संकलन

‘निसर्गमित्र’चा उपक्रम; पर्यावरण दिनानिमित्त तळेरेत मोहीम

तळेरे, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ‘निसर्गमित्र परिवार’ या सामाजिक संस्थेतर्फे येथील श्री देव गांगेश्वर मंदिर परिसरातील देवराईमध्ये वड आणि चाफ्याचे वक्षारोपण करण्यात आले. सीड बॅंकेमध्ये विविध प्रकारच्या बिया स्वीकारुन त्यांचे संकलन सुरू करण्यात आले.
निसर्गमित्र परिवार ही संस्था अनेक वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि संगोपन याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा संकल्प करून येथील श्री गांगेश्वर मंदिर देवराई परिसर विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध करण्याचे निश्चित करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात आज वृक्षारोपण आणि बी संकलन मोहिमेद्वारे करण्यात आली.
यावेळी संस्थेची विशेष सभाही आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेचे सचिव राजेश जाधव यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना यावर्षीपासून संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सीड बॅंकेची व सीड बॉलची संकल्पना स्पष्ट केली. वृक्षारोपण व संगोपन करण्याच्या कार्यात संस्थेचे सभासद, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी वडाच्या रोपाचे रोपण संस्थेच्या सभासद आणि श्रावणी कॉम्प्युटरच्या संचालिका श्रावणी मदभावे, कुमारी नांदलस्कर व भार्गवी खानविलकर यांच्या हस्ते, तर चाफ्याच्या झाडाचे रोपण माजी सरपंच चंद्रकांत तळेकर व संस्थेचे माजी अध्यक्ष दादा महाडिक यांच्या हस्ते झाले. माजी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, ‘निसर्गमित्र परिवार’चे अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव, सल्लागार शशांक तळेकर, दादा महाडिक, चंद्रकांत तळेकर, सदस्य प्रवीण वरुणकर, सतीश मदभावे, मदभावे, भरत चव्हाण, डॉ. अभिजीत कणसे, प्रमोद कोयंडे, निकेत पावसकर, दीपक नांदलस्कर, दळवी महाविद्यालयाचे प्रा. प्रशांत हटकर आदी उपस्थित होते.
..............
चौकट
बी संकलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
संस्थेमार्फत ‘सीड बॅंके’ची संकल्पना स्पष्ट करून विविध प्रकारच्या फळ बिया जमा करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी जमा केलेल्या बीया संस्थेकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये जांभूळ, रतांबा, रायवळ आंबे, चिकू अशा विविध बियांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT