कोकण

राजापुरात 1400 किलो प्लास्टिकचे संकलन

CD

rat६p२३.jpg
०७४६४
शीळः वृक्षारोपण करताना गटविकास अधिकारी विवेक गुंड, सरपंच अशोक पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक पी. के. डिगुळे आणि सहकारी.
------------
राजापुरात १४०० किलो
प्लास्टिकचे संकलन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत गावोगावी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासन, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या अभियानामध्ये सुमारे १ हजार ४०० हून अधिक किलो प्लास्टिकचे संकलन झाल्याची माहिती गटविकास अधिकारी गुंड यांनी दिली.
या अभियानामध्ये गटविकास अधिकारी गुंड यांच्यासह त्या त्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आदींसह ग्रामस्थ, प्रशासन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या अभियानामध्ये ओल्या आणि सुक्या कचर्‍यासोबत पर्यावरणाला घातक ठरणार्‍या प्लास्टिकचेही संकलन करण्यात आले. त्यामध्ये १ हजार ४०० हून अधिक प्लास्टिकचे संकलन झाले आहे. या कचर्‍याची ग्रामपंचायत स्तरावर योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असाही संदेश देण्यात आला.

चौकट
प्लास्टिकची करणार विक्री
स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गावोगावी संकलित केलेल्या विविध स्वरूपाच्या प्लास्टिकचे तालुकास्तरीय एकत्रित संकलन करून त्याची विक्री केली जाणार आहे. पंचायत समितीसह त्या त्या ग्रामपंचायतीला उत्पन्नही मिळणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी गुंड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT