कोकण

दाभोळ भारती शिपयार्डमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या

CD

rat6p28.jpg-
07493
नीलेश राणे यांचे स्वागत करताना कामगार
-----------
दाभोळ भारती शिपयार्डमध्ये
स्थानिकांना प्राधान्य द्या
नीलेश राणे ; कामगारांचे प्रश्न जाणून घेत व्यवस्थापनाशी चर्चा
गुहागर, ता. ६ः नव्या व्यवस्थापनासह पुन्हा सुरु झालेल्या दाभोळ येथील भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे अशी आग्रही मागणी भाजपा नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी केली व्यवस्थापनाकडे केली. तर कामगारांच्या अन्य मागण्यांसाठी व्यवस्थापनासोबत त्यांनी बैठकही घेतली. यावेळी दाभोळ येथे कामगार संघटनेची घोषण नीलेश राणे यांनी केली.
दाभोळ येतील भारती शिपयार्ड कंपनी नव्या व्यवस्थापनासह सुरु झाली आहे. मात्र स्थानिक कामगारांवर अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी भाजप नेते माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागरला भेट दिली. यासाठी दाभोळ ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच श्रीमती दाभोळकर, उपसरपंच जावकर यांच्यासह भाजपचे उत्तर रत्नागिरीचे कार्याध्यक्ष केदार साठे, जिल्हा नियोजन समिती सदस्य नीलेश सुर्वे, समर्थ कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रवीण नलावडे, नंदू चव्हाण आदी कामगार नेते व भाजपा पदाधिकारी यांच्यासह शेकडो कामगार उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने माजी खासदार नीलेश राणे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. भारती शिपयार्ड कंपनी पुन्हा सुरू झाली असली तरीही कंपनीने स्थानिक कामगारांना सामावून घेतेलेले नाही. कामगारांसाठी ठेवलेल्या अटी जाचक आहेत. त्याचवेळी जुन्या व्यवस्थापनाकडचा थकीत वेतनाबाबतचा प्रश्न अद्यापही निकाली निघालेला नाही. राणे यांनी कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले आणि आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. या सभेनंतर त्यांनी कामगारांसह कंपनी व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. उद्योग चालले पाहिजेत हीच आमची भूमिका आहे मात्र कंपनी चालताना जर स्थानिक कामगारांवर अन्याय होत असेल, ते उपाशी राहणार असतील तर आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार असा स्पष्ट इशारा त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला. कामगारांसह कंपनी व्यवस्थापनाची बाजू सुधा त्यांनी प्रतिनिधींकडून जाणून घेतली. तर स्थानिकांना सामावून घेण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT