कोकण

दाभोळ-कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपदी डॉ. संजय भावे

CD

पान १ साठी

०७६३०

कोकण कृषी विद्यापीठाच्या
कुलगुरूपदी डॉ. संजय भावे
दाभोळ, ता. ६ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय भावे यांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी डॉ. भावे यांची नियुक्ती केली आहे. डॉ. संजय भावे या विद्यापीठाचे १५ वे कुलगुरु म्हणून विद्यमान कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
डॉ. भावे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुसूत्र असून कोकण कृषी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. याच विद्यापीठामधून त्यांनी अनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन (Genetics and Plant Breeding) या विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. गेली २३ वर्षे ते या विद्यापीठात विविध पदांवर कार्यरत आहेत. नोकरीची सुरुवात सहाय्यक प्राध्यापक पदापासून केली. त्यानंतर ते सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता (वनशास्त्र), संचालक, विस्तार शिक्षण, या पदांवर काम केले आहे. सध्या ते विद्यापीठामध्ये संशोधन संचालक या पदावर कार्यरत आहेत.
डॉ. भावे यांनी आत्तापर्यंत १२ आचार्य पदवी विद्यार्थ्यांना तर ३५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. संशोधक म्हणून त्यांनी आत्तापर्यंत विविध तृणधान्य, कडधान्य आणि गळीतधान्य पिकांच्या २१ जाती विकसित केल्या आहेत. लाल भाताची रत्नागिरी ७ आणि रत्नागिरी ८ या जाती विकसित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कोकणातील विविध गावांमध्ये एक गाव एक उत्पादन ही संकल्पना राबविली. शेतकऱ्यांसाठी किमान कौशल्यावर आधारीत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. सिंधुदुर्ग जिल्हा विकास नियोजन समितीच्या निधीतून जिल्हयामध्ये अन्न सुरक्षा दलांची स्थापना केली आणि त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न केले. डॉ. भावे यांच्या कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणातील योगदानाबद्दल त्यांना वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. डॉ. भावे यांच्या रुपाने एक जाणकार, लोकप्रिय आणि अनुभवी व्यक्ती कुलगुरुपदी विराजमान होणार असल्याने विद्यापीठ परिवारात तसेच कोकणात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT