कोकण

बाजार समितीचा परवाना बंधनकारक

CD

बाजार समितीचा परवाना बंधनकारक
तुळशीदास रावराणे ः व्यापाऱ्यांनी बाजार शुल्क भरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या नियमित विविध पिकांची खरेदी-विक्री प्रक्रिया करीत असलेल्या सर्व खरेदीदारांनी (व्यापाऱ्यांनी) बाजार समितीचा रीतसर परवाना घ्यावा. नियमानुसार बाजार व देखरेख शुल्क सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीकडे भरणा करावी, असे आवाहन सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंधुदुर्गने नियमन केलेल्या आंबा, काजू-बी, सुपारी, भात (सडीक/बिनसडीक) मासळी व इतर जलचर प्राणी, गहू, केळी, कलिंगड, पालेभाज्या व भाज्या, पशुपक्ष्यांपासून मिळणारे उत्पन्न, अंडी, कोंबड्या, गुरेढोरे, मेंढ्या व बकरी, वन उपजत बांबू व जळावू लाकूड, इमारती व खैराचे लाकूड, इतर फुले, गळीत धान्य भुईमूग (फोडलेला व न फोडलेला), नारळ, विड्याची पाने, कडधान्य हरभरा, उडीद, मूग, वाल, चवळी, वाटाणे, तेल व तूप आदी शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवसाय करीत असलेल्या जिल्हा कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) नियम १९६७ चे कलम ६ (१) अन्वये आवश्यक असलेला बाजार समितीचा रितसर परवाना घेऊन खरेदीदारांनी आपल्या खरेदी किमतीवर शेकडा एक रुपया बाजार शुल्क व खरेदी किंमतीवर शेकडा पाच पैसे देखरेख शुल्क बाजार समितीकडे भरणा करणे कायदयाने बंधनकारक आहे. जिल्ह्यात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्यास बाजार समितीच्या परवान्या संबंधीची आवश्यक ती पूर्तता त्वरित समितीकडे ओरोस येथील मुख्य कार्यालयात येऊन करावी, अन्यथा कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली असून नवनिर्वाचित संचालक मंडळ कार्यरत झाले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतमालाकरिता बाजारपेठ व व्यापाऱ्यांना सुविधा पुरविण्याकरिता बाजार आवार उभारणीकरिता समिती प्रयत्नशील आहे. ५ जूनच्या सभेतील ठरावाप्रमाणे जिल्हा कार्यक्षेत्रातील वरील नियमित पिकांची खरेदी-विक्री प्रक्रिया करीत असलेल्या सर्व खरेदीदारांनी (व्यापाऱ्यांनी) बाजार समितीचा रितसर परवाना घेऊन नियमानुसार बाजार शुल्क व देखरेख शुल्क भरणा करून समितीस सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election Candidates List : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; पक्षनिहाय उमेदवारांची यादी आली समोर, सर्वाधिक भाजपला संधी

Central Railway: मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक, लोकल सेवा पूर्ण बंद राहणार, मेल गाड्यांनाही फटका बसणार; कधी आणि कुठे?

India Census 2026 : राज्यात आजपासून जनगणनेला सुरूवात! घरबसल्या स्वतःच भरा ऑनलाईन माहिती; 'स्व-गणना' करण्याची काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांकडून टोल घेऊ नका- एकनाथ शिंदे

Char Dham Yatra: फक्त २ दिवसांत पूर्ण होणार चारधाम यात्रा? हवाई सेवेने दर्शन झाले सुपरफास्ट पण.. शंकराचार्यांनी दिला खास सल्ला

SCROLL FOR NEXT