कोकण

असलदे गावात दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव

CD

kan81.jpg
08191
असलदे : येथील ग्रामपंचायत सभागृहात दहावी, बारावी परीक्षेत उज्‍वल यश मिळविलेल्‍या भक्‍ती हडकर हिचा सत्‍कार सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके व इतर मान्यवरांनी केला.

असलदे गावात दहावी,
बारावीतील गुणवंतांचा गौरव
ग्रामपंचायत, रामेश्वर सोसायटीच्यावतीने कार्यक्रम
कणकवली, ता. ८ : असलदे गावात दहावी आणि बारावी परीक्षेत उज्‍वल यश मिळविलेल्‍या विद्यार्थ्यांचा सत्‍कार असलदे ग्रामपंचायतीच्या रामेश्‍वर सभागृहात झाला. दहावी परीक्षेत ९१ टक्‍के गुण संपादन करणारी भक्ती दयानंद हडकर हिचा विशेष सत्‍कार करण्यात आला. असलदे ग्रामपंचायत आणि रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या यांच्या संयुक्‍तपणे हा कार्यक्रम झाला. असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी, बारावी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कोळोशी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर, माजी चेअरमन प्रकाश परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे, कृषी तज्ञ प्राध्यापक प्रसाद ओगले, आत्मा व्यवस्थापक विनायक पाटील, माजी सरपंच लक्ष्मण लोके, प्रदिप हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे, विद्या आचरेकर, विद्या डामरे, सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात, ग्रामसेवक आर. डी. सावंत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT