ratnagiri rain 
कोकण

Ratnagiri Rain Update : ‘बिपरजॉय’चा प्रभाव; रत्नागिरीत पाच तालुक्यांत पावसाची हजेरी

वेगवान वाऱ्‍यासह समुद्र खवळलेला, प्रशासनाकडून सूचना

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : बिपरजॉय वादळाच्या प्रभावामुळे खेड, गुहागर, दापोली, रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. किनारी भागात वेगवान वारे वाहत असून समुद्रही खवळलेला आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे, गावखडी, मिऱ्‍या, गणपतीपुळे येथे भरतीवेळी समुद्राच्या लाटा उसळत होत्या. वादळामुळे नुकसान झाल्याची घटना घडलेली नाही; मात्र जिल्हा प्रशासनाच्या आवाहनामुळे किनारी भागातील नागरिक सतर्क झाले होते.

जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासांत सरासरी २ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली होती. आज पहाटेच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. वेगवाने वारेही वाहत होते. रत्नागिरी शहरासह परिसरातील गावांमध्ये पावसाची नोंद झाली.

पंधरा ते वीस मिनिट पडलेल्या हलक्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले होते. चक्रीवादळ पुढे सरकत उत्तरेकडे गेल्यामुळे मोठा परिणाम जाणवलेला नाही; परंतु दिवसभर किनारी भागात वारे वाहत होते. दापोलीत हर्णै, आंजर्ले परिसरात पहाटेला वारे वाहत होते. प्रशासनाच्या आवाहनामुळे खाडी किनारी छोट्या होडीने मासेमारी करणारेही समुद्रात गेले नाही. शुक्रवारी सायंकाळी गावखडी किनाऱ्‍यावरील सुरूची झाडे लाटांच्या तडाख्यात वाहून गेली आहेत.

पावसाचे प्रमाण
तालुका - पाऊस (मि.मी.)

दापोली - २.००
खेड - ३.००
गुहागर - १२.००
रत्नागिरी - १.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT