कोकण

पावसाच्या सरी बरसताच चढणीचे मासे पकडण्याची लगबग सुरू

CD

४ (टूडे पान १ साठी अँकर)

rat१४p१४.jpg, rat१४p१५.jpg
२३M०९३०७, २३M०९३०८
ः संगमेश्वर ः चढणीचे मासे पकडण्याची लगबग.
(छाया ः प्रतीक मोरे, देवरूख)

सरी बरसताच चढणीचे मासे पकडण्याची लगबग

बांधण बांधण्याची शक्कल; वेगवेगळ्या पद्धती वर्षानुवर्षे वापरात

संगमेश्वर, ता. १४ ः सरी बरसताच चढणीचे मासे पकडण्याची लगबग सड्यांवर सुरू आहे. अधिवास वगैरे शब्द न वापरता जीवनशैली म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे इथली माणसं, प्राणी, पक्षी आणि सर्व घटकांचे निर्माण झालेले सहजीवन. शेती, पाणी आणि खाद्यविषयक अनेक गरजा लिलया भागवणारे सडे पावसाच्या सुरवातीच्या काळात अक्षरशः माणसांनी भरलेले दिसतात. याची अनेक कारणे आहेत. शेतीची कामे, स्वच्छ पाणी, शेवळासारख्या रानभाज्या मिळवण्यासाठी लोकांची सड्यावर झुंबड उडते; रात्री खेकडे आणि मासे पकडण्यासाठीसुद्धा अनेक लोक सड्यावर येतात. या प्रकारच्या पारंपरिक मासेमारीसाठी वेगवेगळ्या पद्धती वर्षानुवर्षे वापरात आहेत त्यातील एक पद्धत म्हणजे बांधण.
याबाबत माहिती देताना वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे म्हणाले, ''पोटात अंडी असणारे मासे संथ पाण्यात, डोहात अंडी सोडण्यासाठी पाण्याच्या उलट प्रवाहात वरच्या दिशेने प्रवास करतात. यांनाच मळ्याचे मासे अशा नावाने ओळखले जाते. रंगाने काळे असणारे, देखणे दिसणारे, सरळ नेटक्या बांध्याचे हे मासे खायलादेखील खूप रूचकर लागतात. हे मासे खूप स्वच्छ असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने पकडले जातात. पाट काढून मासे पकडणे, वरच्या दिशेने बांध घालून पाणी अडवून दुसऱ्या पाटाला पाणी घालवून कमी झालेल्या पाण्यातील मासे एकाने खाली हुसकावत मासे पकडणे, चढणीचे मासे बांधणात पकडणे, नदीला मोठा बांध घालून मध्यभागी लाकडे, वासे टाकून फाडी पाडली जाते, त्याखाली टोके लावतात. टोक्यात मासे येण्यासाठी बांबूचे सक असतात, त्या सकातून मासे थेट टोक्यात जाऊन पडतात. मोठ्या पावसात मात्र बहुतेक सर्व बांधणे वाहून जातात. बांधणात पकडलेले मासे विकत घेण्यासाठी गर्दी होते. पहिल्या पावसातील हे मासे खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. आदिवासी महिला मासे पकडून त्याच्या विक्रीतून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. बांधण घालण्यासाठी झाडांच्या फांद्या, गवत, पेंढा, बांबू असे घटक वापरले जातात.
--
सड्यांचे महत्व अबाधित

याबाबत स्थानिकांशी संवाद साधला असता वर्षानुवर्षे पकडल्या जाणाऱ्या माश्यांची संख्या कमी होत नसल्याचे मत ऐकायला मिळते. अर्थात् यावर अजून शास्त्रीय अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे. यातून कदाचित सड्यांचे महत्व अबाधित राहून मासे पकडण्याचा आणि शाश्वत मासेमारीचा नवीन पर्याय समोर येऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwalच्या गळ्याभोवतीचा फास आवळला, महिला व्यावसायिकलाही धमकावलं| Pune police | Sakal News

मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार! लवकरच हाय-टेक कॅंडेला बोटी समुद्रात उतरणार, कशी आहे रचना?

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी 'आयएनएस विक्रांत'वर जवानांसोबत साजरी केली दिवाळी; म्हणाले- माझ्यासाठी भाग्याचा क्षण

World Osteoporosis Day 2025: चाळीशीतच हाडे ठिसूळ होण्याचा धोका, महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची वाढती समस्या; जाणून घ्या कारणे अन् उपाय

भावा...! Adam Zampa च्या नावाने आर अश्विनला मॅसेज; माजी फिरकीपटूने घेतली मजा, मोहम्मद शमीलाही तोच मॅसेज अन्...

SCROLL FOR NEXT