कोकण

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी

CD

१३ (पान २ साठी, अँकर)
दप्तर घेतलेल्या विद्यार्थ्याचे कार्टुन वापरावे

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी

वर्षभरासाठी एकच पुस्तक; यंदापासून अंमलबजावणी


राजापूर, ता. १४ ः पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा सर्व विषयांचा समावेश असलेले एक पुस्तक तयार करण्यात आले आहे. एका पुस्तकामध्ये तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाचा समावेश करून अशी चार भागांची चार पुस्तके तयार केली आहेत. या पुस्तकात वह्यांची कोरी पानेही आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रमांची टिप्पणी करून ठेवणे अधिक सुलभ आणि सोयीचे होईल. या साऱ्यातून विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी होणार आहे.
शिक्षण विभागाने उन्हाळ्यामध्ये पाठ्यपुस्तकांच्या मागणीची नोंदणी केलेली होती. त्याप्रमाणे पुस्तके उपलब्ध झाली असून या पुस्तकांचे शाळांमध्ये वितरणही करण्यात आले आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी (ता. १५) विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तक पडून पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा श्रीगणेशा करता येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या काही वर्षापासून दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पुस्तके ही विषयानुसार स्वतंत्र असून, ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना सोबत बाळगावी लागत होती. पुस्तक, वह्या यामुळे मुलांच्या दप्तराचे ओझे वाढते. यावर तोडगा काढून पुस्तकांची संख्या कमी करून वा अन्य उपाययोजना करून मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करावे, अशी मागणी पालकांकडून गेल्या काही वर्षापासून केली जात होती. यावर्षी त्यावर उपाययोजना करून पाठ्यपुस्तकांची संख्या कमी करून दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक तयार केले आहे. ज्या कालावधीतील अभ्यासक्रम सुरू तो एक पाठ्यपुस्तकांचा भाग विद्यार्थी शाळेत घेऊन येईल. अन्य तीन भाग त्या कालावधीत विद्यार्थ्याला घरी ठेवता येणार आहेत. पाठ्यपुस्तकातील कोऱ्‍या पानांवर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमावरील विविधांगी टिप्पणी करणे अधिक सोयीचे आणि सुलभ होणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या या वर्षीच्या या नव्या स्वरूपामुळे पुस्तकांची संख्या घटल्याने या वर्षी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT