कोकण

मडुरेत वीजेचा खेळखंडोबा

CD

मडुरेत वीजेचा खेळखंडोबा

नागरिक त्रस्त’ बांदा येथील कार्यालयही बंद

बांदा, ता. १४ ः मडुरा गावात गेल्या आठ दिवसांपासून वीजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. आधीच उष्म्याने त्रस्त नागरिक वारंवार वीज गायब होत असल्याने पुरते हैराण झाले आहेत. मॉन्सूनपूर्व कामे न केल्याने भविष्यात वीज ग्राहकांना आणखीनच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. बांदा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयही बंद असल्याने आमच्या समस्या मांडाव्यात तरी कोणाकडे? असा सवाल वीज ग्राहक करीत आहेत.
गतवर्षीच्या वादळात मडुरा गावात तब्बल १२ दिवसांनंतर वीज आली होती; मात्र, तेव्हापासून महावितरणने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. गावात ठिकठिकाणी वीज तारा झुडपांमध्ये अडकलेल्या आहेत. वीजवाहिन्यांवर झुडपे वाढल्याने वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करुन वेळ निभावून नेण्याचे प्रकार सुरु आहेत. समस्येवर ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा वीज ग्राहकांचा आरोप आहे. मडुरा गावात वायरमनला सहाय्यक कर्मचारी महावितरणने नियुक्त केला आहे. मात्र, समस्या कमी झालेल्या नाहीत. भरमसाठ वीज बीले व वारंवार वीज गायब होणे यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने तातडीने वीजवाहिन्यांवरील झुडपांची सफाई करावी. अन्यथा महावितरण कार्यालयाला घेराओ घालण्याचा इशारा संतप्त वीज ग्राहकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT