३६ ( पान ५ साठी)
-rat१५p४२.jpg ः
२३M०९६१५
राजापूर ः स्वागतोत्सवाच्या निमित्ताने ढोलताशाच्या गजरामध्ये काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांसमवेत ग्रामपंचायत सदस्य.
-----------
ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने मुलांचे स्वागत
राजापूर ः तालुक्यातील सोलगाव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ येथे झांजपथक आणि ढोलताशांच्या गजरामध्ये मिरवणुकीने शिक्षक-पालक यांनी मुलांचे स्वागत केले. या वेळी मुलांना शासनाकडून उपलब्ध झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आणि मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या स्वागतोत्सवाला ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य नारायण नांगरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नांगरेकर, उपाध्यक्षा माधवी आईर, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागतोस्तव कार्यक्रमाची प्रस्तावना धामापूरकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक ज्ञानेश्वर मगदूम यांनी केले.
-
-ratchl१५७.jpg
२३M०९६१६
ः चिपळूण ः नांदगाव नं.१ जिल्हा परिषद शाळेत बैलगाडीतून विद्यार्थ्याचे झालेले स्वागत.
------------
बैलगाडीतून विद्यार्थ्यांचे स्वागत
चिपळूण ः शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यात विविध ठिकाणी नवोदित विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत होत असतानाच नांदगाव येथे विद्यार्थ्यांचे अनोखे आगमन झाले. नांदगांव शाळा क्र. १ मध्ये नाना भिंगार्डे यांच्या हार, फुलांनी सजवलेल्या बैलगाडीतून ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. या स्वागताने नवागत भारावून गेले. विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि वह्यावाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागण्यासाठी जिल्हा परिषद शाळांसह खासगी संस्थाच्या शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध उपक्रम राबवण्यात आले. कुठे ढोलताशांचा गजर झाला तर कुठे फुलांची उधळण झाली. नांदगाव नं. १ शाळेत मात्र विद्यार्थ्यांचे खास वेगळ्या पद्धतीने स्वागत झाले. बैलावर गुलालाची उधळण आणि सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्याना शाळेत आणले गेले. या वेळी विद्यार्थीदेखील भारावून गेले होते. या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शौक्षणिक उठावांतर्गत ४० हजाराचे साहित्य शाळेस भेट दिले. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी राजअहमद देसाई, केंद्रप्रमुख सुभाष गुरव, सरपंच राजेंद्र शेलार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब भुवड, उपाध्यक्ष संजय पवार, शिक्षणतज्ञ सुशांत शेलार आणि ग्रामस्थ, पालक आदी उपस्थित होते.
---
-rat१५p४१.jpg ः
२३M०९६११
खेड ः कंत्राटी कामगार मिळाल्याने शहरातील साफसफाईच्या कामांना वेग आला आहे.
----------
खेड नगर पालिकेची स्वच्छता ठेकेदारी पद्धतीने
खेड ः नगर पालिकेमध्ये सफाई कामगार संख्या कमी असल्याने कायमस्वरूपी सेवेत असलेल्या कामगारांवर ज्यादा कामाचा ताण पडत आहे; मात्र आता कंत्राटी पद्धतीने कामगार नियुक्त करण्यात आल्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामांना वेग आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासगी सफाई कर्मचारी यांचे कंत्राट संपल्यामुळे शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा वेळेत उचलला जात नव्हता. अखेर खेड नगर पालिकेला कंत्राटी सफाई कर्मचारी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. खेड शहराचा विस्तार वाढत असताना कचरा उचलण्यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. पूर्ण शहराची साफसफाईसाठी नगर पालिकेकडे केवळ २७ कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. त्यातील काही कर्मचारी कार्यालयीन कामकाजात सहभागी करून घेतल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांकडे कामाचा ताण पडतो. पर्यायाने शहरातील कचरा उचलण्याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होऊन शहरात कचऱ्याचे ढीग दिसत होते; मात्र आता खेड नगर पालिकेला ३१ खासगी सफाई कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्याची मंजुरी मिळाली. कंत्राटी कर्मचारी कामावर रूजू झाल्यापासून पावसाळ्यापूर्वीची गटार साफसफाईच्या कामाला वेग आला असून, डासांचा प्रादुर्भावदेखील कमी होत असून नागरिकांमध्ये समाधान आहे.
--
rat१५p४४.jpg ः
२३M०९६४०
सावर्डे ः तनिष्का साळवीने तिचा शाळेचा पहिला दिवस तिच्या आजीसोबत येऊन शालेय शिक्षणाला सुरवात केली.
--------
सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या शाळेत नवागतांचे स्वागत
सावर्डे ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या इंग्रजी माध्यमच्या शाळेत नवगतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका मीरा जोशी यांनी शाळेत नव्याने दाखल झालेल्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर छोटा शिशूच्या चिमुकल्यांसाठी खास सेल्फी पॉईंट बनवून चिमुकल्यांची छायाचित्रे काढण्यात आली. चिमुकल्यांना खेळण्याची मेजवानी समोर ठेवत खेळण्यात रमवले. सह्याद्रीच्या १ली ते ४थी या प्राथमिक शाळा व स्व. गोविंदराव निकम न्यू इंग्लिश स्कूल, सावर्डे येथील जि. प. शाळांमधून नवगतांचे स्वागत करण्यात आले. आज पहिल्या दिवशी मुलांच्या किलबिलाटाने शाळा बहरल्या होत्या. दोन महिन्यानंतर आपले सवंगडी पुन्हा भेटणार, पुन्हा मस्ती खेळ या आनंदात अनेकांचा उत्साह चेहऱ्यावर दिसून येत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.