09697
कणकवली : येथील शिवसेना कार्यालयात बोलताना संजय आग्रे. शेजारी संदेश पटेल, भूषण परुळेकर, दामु सावंत, भास्कर राणे आदी. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)
प्रसंगी स्वबळावर लढण्याचीही तयारी
संजय आग्रे; शिवसेना वर्धापनदिनास दीड हजार कार्यकर्ते जाणार
कणकवली, ता.१६ : भाजप पक्षासोबत आमची शिवसेनेची युती आहे; मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर सर्व जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात ‘गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’, अशी संघटना बांधणी करत आहोत, अशी माहिती शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिली.
येथील शिवसेना कार्यालयात श्री.आग्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परूळेकर, भास्कर राणे, दामू सावंत, सुनिल हरमलकर आदी उपस्थित होते. श्री.आग्रे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ३३ जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. याशिवाय आगामी नगरपरिषदा, नगरपंचायत निवडणुकीसाठी सज्जता ठेवली आहे. दरम्यान, १९ जून रोजी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबईत होत आहे. त्यासाठी सिंधुदुर्गातून ५०० कार्यकर्ते जाणार आहेत. त्याचेही नियोजन पूर्ण झाले आहे.’’
आग्रे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रत्येक कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहोत. येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. त्याअनुषंगाने कुडाळ येथे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन महावितरण पुढील प्रश्न समजून घेतले. तर कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन दाखल्यांसाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच एस.टी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांची भेट घेऊन शालेय फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने चर्चा केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही मार्गांवर पावसाळ्यात पाणी येत असल्याने त्याबाबतची माहिती घेण्यात आली. शासकीय रूग्णालयात रूग्णांना औषध, गोळ्या उपलब्धतेबाबतही आरोग्य विभागाकडून माहिती घेतली आहे. डॉक्टरांच्या रिक्त पदांवर एनआरएचएम अंतर्गत डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरातही काढली आहे, असेही श्री. आग्रे म्हणाले.
---
निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी
पक्षसंघटना वाढीसाठी येत्या काळात मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, आमदार रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागवार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यानुसार बुथ कमिट्यांची स्थापना करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पाच तालुक्यांतील ३३ जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक आठ दिवसानंतर मंत्री जिल्ह्यात येऊन याबाबतचा आढावा घेणार असल्याचे श्री. आग्रे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.