कोकण

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वेंगुर्लेला ८ कोटी २० लाख निधी

CD

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत
वेंगुर्लेला ८ कोटी २० लाख निधी
वेंगुर्ले, ता. १६ ः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील महत्वाच्या सहा रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाकडे तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यावश्यक रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. स्थानिकांनी सुचविलेल्या या कामांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी शिक्षणमंत्री केसरकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत ही कामे प्राधान्याने मंजूर होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री कार्यालयात प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार ही कामे मंजूर झाली आहेत. यात वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड, चिरेखण, दळवीवाडी, नाईकवाडी ते न्हावेली रस्ता, (१ कोटी ८८ लाख), परुळे-कालवण रस्ता (१ कोटी ४५ लाख), चिपी गाडेधाव-कालवण रस्ता (१ कोटी १८ लाख), प्रधानमंत्री जिल्हा मार्ग ५६ ते मातोंड सातवायंगणी घोडेमुख १८६ जोड रस्ता (१ कोटी ६ लाख), होडावडे शाळा नंबर १ ते राऊळवाडी वजराट रस्ता (१ कोटी १८ लाख), आडेली धरण भोवरवाडी रस्ता (१ कोटी ४२ लाख) अशा एकूण सहा रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे ८ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामांना लवकरच प्रारंभ केला जाईल, अशी माहिती मांजरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT