१५ (टूडे ३ साठी)
-rat१६p९.jpg ः
२३M०९७२३
मंडणगड ः पाठ्यपुस्तके वितरण करताना सरपंच, शिक्षक व पालक.
-------------
ढोलताशांचा गजरात स्वागत
शेनाळे शाळा ; घरातून मिरवणूक, पाठ्यपुस्तकांचे वाटप
मंडणगड, ता.१६ ः तालुक्यातील एकमेव आयएसओ शेनाळे शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. घरापासून शाळेपर्यंत चारचाकी गाडीतून मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे आगमन होताच ढोलताशांचा गजर व टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला.
आयएसओ मानांकित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा शेनाळे या शाळेमध्ये मुख्याध्यापक सुनील आईनकर यांच्या संकल्पनेतून शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या मुलांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. प्रथम गावातून दाखल होणाऱ्या पहिलीतील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पालकांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांचं कौतुक करण्यात आले. त्यानंतर सगळ्या मुलांना गाडीमध्ये बसवून गावामधून मिरवणुकीने त्यांना शाळेमध्ये दाखल करण्यात आले. शाळेमध्ये त्यांचे औक्षण करून त्यांना गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच विश्वनाथ सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन जाधव तसेच गावातील अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक गणेश गुळेकर, सतीश खैरे, संदीप राठोड यांनी मेहनत घेतली.
-----
कोट
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे. सर्व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक असून शिक्षकांनी शाळेचे अंतरंग घडवावे, ग्रामपंचायत शाळेचे बाह्यांग घडवेल.
- विश्वनाथ सावंत, सरपंच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.