४ (टुडे पान १ साठी)
मजुरांच्या हजेरीच्या नोंदी अॅपवर
पारदर्शक कारभार ; बोगस मजुरीला आळा
राजापूर, ता. १६ ः गावातील बेरोजगारांना गावामध्ये किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मजुरांच्या हजेरीची नोंदणी करण्यामध्ये अधिक पारदर्शकता यावी या दृष्टीने शासनाने ‘नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टिम’ विकसित केली आहे. त्याद्वारे मोबाईल अॅपवर मजुरांची हजेरी घेण्यात येत आहे. या नव्या सिस्टिममुळे मजुरांची बोगस मजुरी करण्याला एकप्रकारे आळा बसणार आहे.
या योजनेंतर्गंत ग्रामपंचायत, कृषी, वन, लघु पाटबंधारे, बांधकाम आदी विभागांतर्गंत विविध स्वरूपाची कामे केली जातात. त्यामध्ये फळबाग लागवड, वृक्षलागवड, सिंचन विहीर, शेततळे, शोषखड्डे, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जैविक खतनिर्मिती, कुक्कुटपालन शेड तयार करणे, शेत बांधबंदिस्ती आदी स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळतो आणि विकासकामांनाही चालना मिळते. शासनाच्या या रोजगार हमी योजनेतून अनेकांना रोजगार मिळाला आहे; मात्र, या योजनेमध्ये मजुरांच्या मजुरीची नोंदणी करताना भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहे. त्याला आळा घालताना त्यामध्ये पारदर्शकता यावी या उद्देशाने शासनाने नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम विकसित केली आहे. या माध्यमातून मोबाईल अॅपवर मजुरांची हजेरी घेण्यात येत आहे. त्यामुळे मजुरांना मजुरी वेळेत आणि पूर्ण मिळणार आहे. २० किंवा त्यापेक्षा जास्त मजूर कार्यरत असलेल्या कामांवरील मजुरांची मजुरी या अॅपद्वारे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
--------------
दृष्टीक्षेपात
एनएमएमएस वापरण्याचे फायदे
ग्रामरोजगार सेवक यांचा कार्यालयात ये-जे करण्याचा वेळ आणि खर्चामध्ये बचत
मजुरांची मजुरीचे प्रदाने विहित वेळेत प्रदान करणे शक्य होईल
रिल टाईम मॉनिटरिंग करणे शक्य
कामात अधिक पारदर्शकता येणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.