कोकण

चिपळूण ः चौपदरीकरणानंतरही पॉवरहाऊस चौकातील वाहतूक गुंतागुंतीची

CD

फोटो ओळी
- rat१६p१४.jpg- KOP२३M०९७३२ चिपळूण ः पॉवरहाऊसमधील चौकातील वाहतुकीवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत
---------

चौपदरीकरणानंतरही पॉवरहाऊस चौकात वाहतूक गुंतागुंतीची

वाहतूक सुरळीत होण्यासाठी ''आयलॅण्ड'' ; अजूनही अंडरपासची होतेय मागणी

चिपळूण, ता. १६ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत शहरातील महत्वाच्या असणाऱ्या पॉवरहाऊस चौकाच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत होण्यासाठी ''आयलॅण्ड'' निर्माण केला जाणार आहे. महामार्गावरील वाहने चिपळूण शहरात येण्यासाठी व एसटीच्या गाड्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी हा आयलॅण्ड होणार आहे; परंतु या ठिकाणची वाहतूक चौपदरीकरणानंतरही गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.
शहरातील बहादूरशेख चौकानंतर शहरातील पॉवरहाऊस चौक हा महत्वाचा आहे. बहादूरशेख चौक येथे उड्डाणपूल असल्याने गुहागर-विजापूर मार्ग उड्डाणपुलाच्या खालून जाणार आहे, तर चारपदरी उड्डाणपुलावरून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. याच दरम्यान शहरातील महत्वाचा असणारा पॉवरहाऊस चौक वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचा आहे. सुरवातीच्या काळात तेथे उड्डाणपूल मंजूर होता. मात्र, काही नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर येथे अंडरपास मंजूर झाला. मात्र, त्यालाही काही स्थानिक नागरिकांनी विरोध केला. त्यांची चूक त्यांना आता लक्षात आली असून वेळ निघून गेली आहे. विरोध केल्याने उड्डाणपूल आणि अंडरपास रद्द झाला. आता पुन्हा विरोध करणारेच काहीजण या ठिकाणी ओव्हरब्रिज व्हावा, अशी मागणी करत आहेत.
तरीही सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी पॉवरहाऊस येथे उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव तयार होत आहे. मात्र, तोपर्यंत सद्यःस्थितीत असणाऱ्या महामार्गाप्रमाणेच चौपदरीकरण होत आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या पॉवरहाऊस चौकात आयलॅण्ड असणार आहे. मुंबईकडून येणाऱ्या एसटी व अन्य वाहने शहरात येण्यासाठी आयलॅण्डला वळसा घालून येतील. आत शहरात शिरताना त्रिकोणी दुभाजक बांधला जाणार आहे. त्यामुळे आत जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या गाड्यांची वाहतूक योग्य पद्धतीने होण्यासाठी मदत होणार आहे. या चौकात दोन आयलॅण्ड असणार आहेत. याच पद्धतीने दोन्ही बाजूला झेब्रा क्रॉसिंग, राष्ट्रीय महामार्गावरील नियमांप्रमाणे रम्बलर स्ट्रिप तसेच या भागात वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी दोन्ही बाजूला पिवळे ब्लिंकर्स लावले जाणार आहेत.


आराखडा तयार
या आयलॅण्डचा ढोबळ आराखडादेखील तयार करण्यात आला असून त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी या ठिकाणी काम करत आहे. या चौकाच्या ठिकाणी सर्व्हिस रोडचा भाग चौपदरीकरणात घेण्यात आला असून त्याचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सुरळीत आणि निर्धोक होण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत, असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT