कोकण

सागरी महामार्गासाठी चार गावांतील जमिनी

CD

६ (टुडे पान १ साठी)


-rat१६p११.jpg ः
२३M०९७२६
बाणकोट ः गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला बाणकोट बागमांडला सागरी सेतू.
---
सागरी महामार्गासाठी चार गावांतील जमिनी

मंडणगड तालुका ; रेवस-रेड्डी महामार्ग, बाणकोट, केळशी पुलाचा प्रश्न लागणार मार्गी?

मंडणगड, ता. १६ ः महाराष्ट्र शासनाच्यावतीने कोकण किनारपट्टीवर बांधण्यात येणाऱ्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गासाठी मंडणगड तालुक्यातील बाणकोट, नारायणनगर, वेळास, साखरी गावातील सुमारे १५३४.६८ जमीन अधिगृहित करण्यात येणार आहे. याबाबतचे महाराष्ट्र शासन राजपत्र २४ एप्रिल २०२३ ला प्रसिद्ध झाले आहे.
रेवस–रेड्डी सागरी विशेष महामार्ग म्हणून या महामार्गाला विशेष दर्जा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे या महामार्गाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील ४ गावांमध्ये अधिकचे भूसंपादन होणार आहे. याच मार्गावर गेल्या दहा वर्षापासून बहुचर्चित बाणकोट–बागमांडला सागरी सेतू व साखरी व केळशीला जोडणारा पूल अर्धवट बांधकाम केलेल्या अवस्थेत रखडलेले आहेत. महामार्गामुळे रखडलेले हे दोन्ही पूल पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मार्गावर वेळास हे कासवाचे गाव असल्याने त्याच्या विकासात्मक प्रवाहाला गती मिळेल. महामार्गाची निर्मितीची आधीच चाहूल लागलेल्या जमीन दलाल व मोठ्या गंतवणुकदारांनी चार गावातील महामार्गालगतच्या जमिनीची गेल्या तीन ते चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. येथील शेतकरी व जमीनमालकांनी अगदी कवडीमोल भावाने आपल्या जमिनी संबंधितांना राजपत्र जाहीर होण्याआधीच विकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बाजारपेठा गजबजल्या; रेडीमेड गुढींना वाढती मागणी

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT