09778
कुडाळ ः नगराध्यक्षपदी अक्षता खटावकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ नगराध्यक्षपदी खटावकर बिनविरोध
निवडणूक अधिकारी; ‘मविआ’तर्फे शुभेच्छांचा वर्षाव
कुडाळ, ता. १६ ः येथील नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या नगरसेविका अक्षता खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी खटावकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी उपस्थित काँग्रेस-शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी खटावकर यांना शुभेच्छा दिल्या.
येथील नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद नातू, अधीक्षक गितांजली नाईक आदी उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. महाविकास आघाडीत ठरल्याप्रमाणे घटक पक्ष काँग्रेस पक्षाच्या आफ्रिन करोल यांनी १४ मे रोजी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेविका खटावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून १२ जूनला एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधी पक्ष भाजपाने मात्र या निवडणुकीत कोणतीच हालचाल केली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी काळुसे यांनी खटावकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांची निवड जाहीर केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, प्रकाश जैतापकर, माजी नगराध्यक्ष आफ्रिन करोल, श्रेया गवंडे, श्रुती वर्दम, ज्योती दळवी, सई काळप, उदय मांजरेकर, द्वारकानाथ घुर्ये, संतोष शिरसाट, अतुल बंगे, बबन बोभाटे, सुंदर सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.